Sangali : सांगलीत राजापुरी हळदीस 32 हजार दर | पुढारी

Sangali : सांगलीत राजापुरी हळदीस 32 हजार दर

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली मार्केट यार्डात गुरुवारी रााजापुरी हळदीस प्रतिक्विंटल 32 हजार रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. मिरज तालुक्यातील बेडग येथील अण्णासाहेब वसंत ओमासे यांची राजापुरी हळद आज एन. बी. पाटील यांच्या दुकानात सौद्यासाठी आली होती. या हळदीस प्रतिक्विंटल बत्तीस हजार रुपये इतका दर मिळाला.

हि हळद मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली. हळद सौद्यात प्रतिक्विंटल कमीत-कमी नऊ हजार व जास्तीत जास्त 32 हजार व सरासरी चौदा हजार असा दर मिळाला आहे. गेल्या महिन्याभरापासून मार्केट यार्डात हळद सौद्यास सुरुवात झाली आहे. आवक चांगली होत आहे. दरही चांगला मिळत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपली हळद जास्तीत जास्त विक्रीसाठी सांगली मार्केठ यार्डात घेऊन यावी. शासनाच्या हळद, बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button