पुढारी ऑनलाईन
विक्की कौशल-कॅटरीना कैफचं आज ९ डिसेंबर रोजी राजस्थानातील हॉटेल सिक्स सेंसेस फोर्टमध्ये लग्न आहे. (Kat-Vicky Wed) लग्नासाठी सेलिब्रिटींना खास आमंत्रण देण्यात आलंय. बॉलीवूडचे अनेक दिग्गज जयपूर येथे पोहोचले आहेत. (Kat-Vicky Wed) हॉटेलचे लँडलाईनदेखील बंद करण्यात आले आहे. याशिवाय सिक्युरिटी टीमला मोबाईल वापरावर बंदीचे आदेश आहेत. एवढी सुरक्षा असतानाही हॉटेलच्या रूममधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
करण जोहर आणि फराह खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सिक्स सेंसेस फोर्टच्या आतील असल्याचे म्हटले जात आहे.फराह खान-करण जोहर दोघेही कॅटरीना-विक्कीच्या जवळची आहेत. लग्नासाठी दोघे पोहोचले आहेत. त्यांनी एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्ह्डिओ एका हॉटेलमधील दिसतोय. फॅन्सचं म्हणणं आहे की, हा व्हिडिओ सिक्स सेंस रिसॉर्टचाचं आहे.
कॅट-विक्कीने लग्न प्रसारित करण्याचे अधिकार थेट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओला ८० कोटी रुपयांत विकले आहेत. त्यामुळेचं त्यांनी आपल्या पाहुण्यांना देखील एनडीएवर सह्या करण्यासाठी सांगतिलं आहे. कारण, लग्नाआधी लग्नातील कोणतीचं गोष्ट लीक होऊ नये.
विक्की-कॅटरीनाच्या लग्नामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना वेडिंग प्लॅनर्सकडून कोड दिले जाणार आहेत. आणि याची माहिती केवळ हॉटेल स्टाफला असेल. विक्की-कॅटचं लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेंस हॉटेलमध्ये होत आहे. त्यांच्याकडून पाहुण्यांना पाठवण्यात आलेला स्पेशल कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्डमध्ये पाहुण्यांनी फोन घेऊन न येण्याची विनंती करण्यात आलीय.
हेही वाचलं का?