Preity Zinta : प्रीती झिंटाच्या बाळाच्या फोटोवर प्रियांकाचा रेड हार्ट ईमोजी - पुढारी

Preity Zinta : प्रीती झिंटाच्या बाळाच्या फोटोवर प्रियांकाचा रेड हार्ट ईमोजी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ( Preity Zinta ) गेल्या नोव्हेंबर महिन्यात सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली. यानंतर प्रीतीने आपल्या मुलांची जय (मुलगा) आणि जिया (मुलगी) अशी ठेवली आहेत. तर सध्या प्रीतीने दोन्ही मुलातील एकाची पहिली झलक सोशल मीडियावर दाखविली आहे.

नुकतेच प्रीती झिंटाने (Preity Zinta )आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रीतीच्या कुशीत तिचे गोंडस नवजात बाळ दिसत आहे. प्रीतीने आपल्या नवजात बाळाला निळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळले आहे. यावेळी प्रीतीच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसत आहे.

परंतु, शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या बाळाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. प्रीतीने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”उबदार कपडे, डायपर आणि बाळ…हे सर्व मला आवडते #ting.”.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड स्टार्ससोबत अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने या फोटोवर कमेंन्ट करत रेड हार्ट ईमोजी शेअर केला आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी प्रीतीचे अभिनंदन केले आहे.

प्रीती झिंटा सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण लवकरच तिचा निर्माता दानिश रेंजू यांच्या शीर्षक नसलेल्या चित्रपटातून पुनरागमन होणार आहे. या चित्रपटात प्रीती एका धाडसी काश्मिरी आईची भूमिका साकारणार आहे. प्रीतीने १९९८ मध्ये ‘दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट काम केले.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

Back to top button