पुढारी ऑनलाई डेस्क : "आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. आमंत्रण दिले आहे महापालिकेनं. पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर" असं ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Tweet) यांनी खोचक ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोमणा मारला आहे. जितेंद्र आव्हाड अस का म्हणाले? वाचा नेमकं काय आहे प्रकरण.
आज सकाळी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, "आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. आमंत्रण दिले महापालिकेने. पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील"
आणखी एक ट्विट करत त्यांनी म्हटल आहे, त्या पेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बरं, परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना, मी हे करू शकत नाही. तुला कसं कळत नाही. खरच कळत नाही. चलो ये वक्त भी गुजर जयेगा u too brutas
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमधील मारहाणप्रकरणी अटक दिनांक ११ नोव्हेंबर रोजी केली होती. त्यावेळी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी केला होता. याप्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची १२ नोव्हेंबरला जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या महिन्याभरातील जितेंद्र आव्हाडांच्यावरील हा दुसरा गुन्हा होता.
ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम 13 नोव्हेबंर 2022 रोजी झाला होता. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. या कार्यक्रमात आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. ही भाजपची पदाधिकारी होती. तक्रारदार महिला सदर कार्यक्रमावेळी या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी मला चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला. त्यानंतर त्या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले होते की, "पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हा दाखल केले आणि तोही ३५४ चा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिस आत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या. उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही".