

पुढारी ऑनलाईन डेस्क : पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हा दाखल केले आणि तोही ३५४ चा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या. उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी केले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी अटक दिनांक ११ नोव्हेंबर रोजी केली होती. त्यावेळी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला होता. याप्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची १२ नोव्हेंबरला जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या महिन्याभरातील जितेंद्र आव्हाडांच्यावरील हा दुसरा गुन्हा.
ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम 13 नोव्हेबंर 2022 रोजी झाला होता. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. या कार्यक्रमात आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. ही भाजपची पदाधिकारी आहे. तक्रारदार महिला सदर कार्यक्रमावेळी या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी मला चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला. त्यानंतर त्या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा