जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंग गुन्ह्याचा निषेध; जया बच्चन यांच्यासह ‘मविआ’च्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट | पुढारी

जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंग गुन्ह्याचा निषेध; जया बच्चन यांच्यासह 'मविआ'च्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंग गुन्ह्याचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या महिला शिष्टमंडळात अभिनेत्री खासदार जया बच्चन, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, आमदार ऋतुजा लटके, आमदार सुमन पाटील, अदिती तटकरे यांचा समावेश आहे.

ठाणे : आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल; मतदार संघातील कार्यकर्ते आक्रमक, मुंब्रा बायपासवर जाळपोळ (Video)

राज्यात महिलांविषयी होणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली महिलाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर शिष्टमंडळाने प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी खासदार फौजिया खान म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केला नाही. सरकारमधील नेत्यांची महिलांविरोधात बेताल वक्तव्य सुरू आहेत. आता महिला गप्प बसणार नाहीत. लोकप्रतिनिधींवर सरकार असे हल्ले करत आहे, याचा निषेध करत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जय्या बच्चन म्हणाल्या की, महीलांवरील अत्याचार सहन करणार नाही. महिलांबाबत अपमानास्पद बोलत अलणाऱ्यांना राजकारणातून बाहेर काढले पाहिजे. राजकारणात अशा लोकांना स्थान दिले नसले पाहीजे, असे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा चुकीचा वापर

यावेळी विद्या चव्हाण म्हणाल्या की, महिलांसाठी केलेल्या कायद्यांचा सरकारकडून चुकीचा वापर केला जात आहे. आव्हाडांवर दाखल केलेला गुन्हा विनयभंगाचा गुन्हा होऊच शकत नाही. आव्हाडांवरील गुन्ह्याबाबत कोर्टात जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याचा चुकीचा वापर होत असेल तर ते खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतले पाहिजे. मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला ताबडतोब समज द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. घटनेतील शपथ घेतलेल्या लोकांनी महिलांचा सन्मान केला पाहीजे. महिलांशी सभ्यतेने वागले पाहिजे, असे सेक्शन महाराष्ट्रात लागू केले पाहिजे, असेही त्यांना सांगितले. यावर राज्यपालांनी मुख्यंत्र्याना पत्र दिले असून बदल दिसेल असे सांगितले आहे. जर यामध्ये बदल झाला नाही, तर सर्व महिला खासदार व आमदार राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल; मतदार संघातील कार्यकर्ते आक्रमक

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आव्हाड यांच्या या ट्विटचे पडसाद त्यांचा मतदार संघ असलेल्या मुंब्र्यात लगेच उमटले. संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा बायपासवर सकाळीच जाळपोळ सुरू केली आहे. सकाळीच हा प्रकार झाल्याने बायपासवर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आव्हाड यांच्या विरोधात ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले म्हणत आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. मी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. ट्वीटद्वारे त्यांनी तशी घोषणा केली आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार आहे. मी लोकशाहीची हत्या झालेली पाहू शकत नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा :

Back to top button