Latest

जान्हवी कपूर हिचा ‘तो’ फोटो होतोय व्हायरल

backup backup

जान्हवी कपूर हिने नवं घर खरेदी केलं आहे. जुहू येथील नव्या घरात जान्हवी आता शिफ्ट झाली. या नव्या घरात ती वडिल बोनी कपूर आणि बहिण खुशी सोबत राहणार आहे. या घराच्या बांधकामाचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जान्हवी आणि खुशीचे फोटो व्हायरल झाले आहेत. यातील जान्हवीच्या फोटोची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

दरम्यान, जान्हवी कपूर आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अक्षत राजन यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने 'जान्हवी कपूर गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये खूपच हॉट दिसत आहे.' अशी कमेंट केली आहे.

जान्हवी आणि खुशीचे हे फोटो घराच्या टेरेसवर काढले होते. खुशी कपूरच्या वाढदिवसानिमित्त त्या एकत्र आल्या होत्या. डायनिंग एरियापासून ते स्विमिंग पूल आणि पार्टी एरियापर्यंत या टेरेसवरून दिसणारे दृश्य खूपच विहंगम आहे. टेरेसवरती उभे राहून मुंबई दिसते.
खुशी कपूरने शुक्रवारी तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसावा तिचे जवळचे मित्र होते. काही सेलिब्रिटीही उपस्थित होते. पार्टीला अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप, सुनील शेट्टीचा मुलगा अहान आणि त्याची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ, वरुण धवनची भाची अंजिनी यांनीही हजेरी लावली होती.

इंस्टाग्रामवर तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. तिने हा फोटो शेअर करुन बार्बी बेबी असं म्हटलं होते. जान्हवी कपूर या वर्षभरात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ती लवकरच सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती करण जोहर दिग्दर्शित 'दोस्ताना 2' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलत का?

८ मांजरींचं बाळंतपण करणारी अभिनेत्री जुई गडकरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT