Latest

लग्नाआधीचा मानसिक आजार लपवणे म्हणजे फसवणूक; दिल्ली उच्च न्यायालय

backup backup

दिल्ली : पुढारी ऑनलाईन : लग्नापूर्वी असलेले मानसिक आजार लपवणे, माहिती न देणे ही फसवणूक आहे, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे. घटस्फोटसाठी दाखल झालेल्या एका याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला आहे.

याचिकाकर्त्या पुरुषाचे लग्न २००५ला एका महिलेशी झाले, पण या महिलेला स्क्रिझोफ्रेनिया असल्याची माहिती या पुरुषाला देण्यात आली नव्हती. उच्च न्यायालयाने निकाल देताना घटस्फोटला मान्यता दिली. न्यायमूर्ती विपिन सिंग आणि जसमित सिंग यांनी हा निकाल दिला.
न्यायमूर्तीने निकाल देताना म्हटले की, "हा प्रक्रियेत या पुरुषाला त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षं निरर्थक अशा नातेसंबंधात घालवावी लागली आहेत. तसे झाले नसते तर त्याला त्याचं वैवाहिक जीवन आनंदात घालवता आले असते."

मानसिक आजार लपवणे फसवणूक : घटस्फोटासाठी अर्ज

या घटनेत लग्न होण्यापूर्वीच या पुरुषाला स्त्रीच्या मानसिक स्थितीची माहिती देणे आवश्यक होते, तसे न करणे हे फसवणूक आहे.
यातील पती संदीप आगरवाल यांनी यापूर्वी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण हा अर्ज फेटाळण्यात आला.

"घरी असताना आणि हनीमून वेळी बायको अत्यंत विचित्र वागत होती. त्यानंतर तिला विविध डॉक्टर आणि AIIMSमध्येही दाखवले. त्यातून तिला तीव्र स्वरूपाचा स्क्रिझोफ्रेनिया असल्याचे निष्पन्न झाले आहे. पण लग्नापूर्वी याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती," असे याचिकेत म्हटलेले आहे.

तर प्रतिवादी बायकोने तिला कसलाही आजार नसल्याचे म्हटले आहे. कॉलेज काळात फक्त डोकेदुखीचा त्रास होत असे, ही माहिती नवऱ्याला दिलेली होती, असे म्हणणे तिने मांडले. पण कोर्टाने नियुक्त केलेल्या मेडिकल बोर्डकडे तपासणी करून घेण्यास तिने नकार दिला, यावरून तिला तपासणीला सामोरे जायचे नाही, असा निष्कर्ष कोर्टाने काढला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT