Latest

HBD Johnny Lever : कधीकाळी रस्त्यावर पेन विकणारा अभिनेता कोटींचा मालक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. (HBD Johnny Lever) ८० च्या दशकातील चाहत्यांमध्ये जॉनी लोकप्रिय होता आणि आताही आहे. जॉनी लिव्हरने आज जे स्थान मिळवले आहे तिथे पोहोचणे इतके सोपे नाही. कॉमेडियन जॉनी यांनी खूप मेहनत आणि झोकून देऊन करिअरची ही उंची गाठली आहे. एकेकाळी रस्त्यावर पेन विकत असलेला जॉनी लिव्हर आज कोटींचा मालक आहे. तुम्हाला माहितीये का, जॉनी लीव्हरची संपत्ती किती आहे? (HBD Johnny Lever)

जॉनी लिव्हरच्या कॉमेडीचे लोक खूप वेडे आहेत. त्याचे फॅन फॉलोईंगही मोठे आहे. पण हे स्थान मिळवण्यासाठी त्याने किती मेहनत घेतली हे फार कमी लोकांना माहीत असेल.

कधी काळी विकले पेन

जॉनीने कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे केवळ सातवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी जॉनी लिव्हरने पेनही विकले आहे. दिवसाला तो ५० रुपये कमावायचा. ही आठवण सांगताना जॉनीने एका कार्यक्रमात सांगितले होते की, तो एकदा खॉटवर पेन विकण्यासाठी उभा होतो. लोकांनी पेन विकत घ्यावे म्हणून तो वेगवेगळे आवाज काढायचा. अनेक अभिनेत्यांच्या आवाजात वेगवेगळे हावभाव करून तो पेन विकायचा. त्यावेळी एक माणूस तिथे आला, त्याने पेन पाहिले. पण खरेदी केले नाहीत. जाताना तो म्हणाला की, इतकं ओरडतोस कशाला? तुला काय आवाज काढायचे आहेत ते पलिकडच्या थिएटरमध्ये जाऊन काढ. जॉनी जिथे पेन विकायचा, त्याचया पलीकडे चित्रपटगृह होते. जॉनी अखेर चित्रपटात आला.

जॉनी कोटींचा मालक

रिपोर्टनुसार, जॉनी लिव्हर कोटींमध्ये खेळतो. आकडेवारीनुसार, जॉनी लीव्हरची एकूण संपत्ती सुमारे २७७ कोटी असल्याचे सांगितले जाते. जॉनी लिव्हरने इतकी संपत्ती केवळ चित्रपटांशी जोडली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्याने स्टेज शो देखील केला आहे. एवढेच नाही तर जॉनी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन आणि मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

वार्षिक उत्पन्न किती आहे? 

कॉमेडियनची वार्षिक कमाई १२ कोटींच्या आसपास आहे. दुसरीकडे, जॉनीच्या घराबद्दल सांगायचे तर, तो अंधेरी पश्चिम मुंबईतील लोखंडवाला येथे एका खूप मोठ्या थ्री बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतो. याशिवाय त्याच्याकडे मुंबईत आणखी काही फ्लॅट्ससह एक सुंदर व्हिला आहे.

कार कलेक्शन

जॉनी लीव्हरकडे Q7, Honda Accord आणि Toyota Fortuner सारखी महागडी वाहने आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT