कुरकुंभ : जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार | पुढारी

कुरकुंभ : जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: कुरकुंभ (ता. दौंड) येथील एका पीडित महिलेला जीव मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याप्रकरणी कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील दोन जणांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर सुद्रिक व दादा शेलार (दोघे रा. बारडगाव सुद्रिक, ता. कर्जत, जि. अहमदनगर, पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल व्यक्तींचे नाव आहे.
याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे एक दुकान आहे. दुकानासमोर वाहन लावणे व वस्तू खरेदी करणे यातून वरील आरोपींची व पीडित महिलेची ओळख व संभाषण झाले. ओळखीतून पीडित महिलेकडून 5 हजार रुपये उसने पैसे घेतले होते. वारंवार पैशाची मागणी केल्यावर ‘पैसे देतो, घराचा पत्ता सांगा,’ असे म्हणत पीडित महिला घरात एकटी असताना बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. ‘याबाबत बाहेर कोणाला काही सांगितले, तर तुझा व्हिडीओ व्हायरल करून इज्जत घालवून जिवे मारून टाकू,’ असा दम दिला.

Back to top button