बेळगाव : मांजरी, येडूर, चंदूर गावांना पुराचा धोका | पुढारी

बेळगाव : मांजरी, येडूर, चंदूर गावांना पुराचा धोका

अंकली; पुढारी वृत्तसेवा : कोकण प्रदेशात होणारा पाऊस आणि विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात सुरू झाला आहे. कृष्णा नदीकाठावर पावसाची उसंत असली तरी महाराष्ट्रातून येणार्‍या पाण्यामुळे कृष्णाकाठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे.

इंगळीमळे भागातील अनेक कुटुंबांना पुराचा वेढा बसला आहे. पुराच्या पाण्यातूनच त्यांची ये-जा सुरू आहे. मांजरी येथील हरितक्रांती वसाहतीला जाणार्‍या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने नागरिकांना वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button