Latest

Hasan Mushrif : कागलमध्ये मुश्रीफ समर्थकांकडून किरीट सोमय्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Shambhuraj Pachindre

कागल; पुढारी वृत्तसेवा : आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या निवासस्थानावर केंद्रीय तपास यंत्रणेने छापा टाकून चौकशी सुरू केल्याच्या निषेधार्थ कागल शहरांमध्ये दिवसभर कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी गैबी चौकामध्ये किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून शंख ध्वनी केला. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी यांनी दिवसभर कागल शहरात येऊन छाप्याचा निषेध केला. ११ तास होवूनही अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. आणखीन किती तास तपास केला जाणार आहे असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. आक्रमक झालेले कार्यकर्ते दिवसभर गैबी चौकामध्ये तळ ठोकून होते. दरम्यान, गैबी चौकातून आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता अडथळा निर्माण करून बंद करण्यात आला आहे. (Hasan Mushrif)

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT