Shahid Farzi : शाहिदने ‘नकली’ अभिनेत्यासोबत केलं शूट ; ‘फर्जी’चा ट्रेलर रिलीज | पुढारी

Shahid Farzi : शाहिदने 'नकली' अभिनेत्यासोबत केलं शूट ; 'फर्जी'चा ट्रेलर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहिद कपूर याच्‍या ‘फर्जी’ या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Shahid Farzi) ‘फर्जी’चा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हालाही उत्सुकता वाढेल. व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. (Shahid Farzi)

‘फर्जी’सोबत फर्जी शाहिद!

‘फर्जी’च्या निर्मात्यांनी एक अनोखी पद्धत स्वीकारलीय. निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केलाे; पण नकली ट्रेलर. हा ट्रेलरदेखील वेब सीरीजच्या नावाप्रमाणे फर्जी आहे. ‘फर्जी’चा ट्रेलर सुरू होताच तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण, या व्हिडिओमध्ये शाहिद कपूरदेखील ‘फर्जी’ आहे.

‘फर्जी’चा ‘असली’ ट्रेलर १३ जानेवारीला रिलीज होणार

‘फर्जी’च्या धमाकेदार ट्रेलरची सुरुवात दमदार होते. ट्रेलरची सुरुवात शाहिद कपूरच्या दमदार ॲक्शन सीनसोबत होते. तेव्हा तो डायलॉग म्हणतो की, ‘असली बनून का मि‍ळालं?’ तेव्हा शूटिंग अचानकमध्ये थांबवले जाते. त्यावेळी रिअल शाहिद कपूर येतो. तेव्हा समजतं की, ज्याला आपण शाहिद कपूर समजत हतो तो त्याच्यासारखा दिसमारा दुसरा कलाकार आहे. यानंतर शाहिद त्याला विचारतो की, हे काय होत आहे?’ यावर तो उत्तर दोतो की, ‘फर्जी’च्या ट्रेलरचे शूटिंग करत आहे. शाहिद कपूर रागात भडकतो आणि म्हणतो की,हा ट्रेलर फर्जी आहे, हा शाहिददेखील फर्जी आहे. माझा आगामी ‘फर्जी’ चा असली ट्रेलर १३ जानेवारीला रिलीज केला जाईल, असे तो सांगतो.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

Back to top button