Latest

HBD Shabana Azmi : कधी काळी कॉफी विकून ३० रु. कमवायच्या शबाना आझमी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज १८ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या चाहत्यांपासून ते सोशल मीडियावरील सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शबाना आझमी यांनी ७० च्या दशकात आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर ८० आणि ९० च्या दशकात अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर, १९५० रोजी हैदराबाद येथे झाला. शबाना आझमी यांनी मुंबईतील क्वीन मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली.

शबाना आझमी यांनी १९७३ मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) पुणे येथून अभिनयाचा कोर्स केला. जया बच्चन यांच्या प्रेरणेने त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला. शबाना आझमी यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या अंकुर या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि या क्लासिक चित्रपटात मोलकरणीची भूमिका केली. या चित्रपटातील अभिनयासाठी शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट १९७४ मध्ये आला होता.

शबाना आझमी महेश भट्ट दिग्दर्शित 'अर्थ' या चित्रपटातही दिसल्या होत्या, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या खंडार या चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल सेन यांनी केले होते. त्यांच्या आईचे नाव शौकत आझमी आणि वडिलांचे नाव कैफी आझमी होते. जो त्याच्या काळातील प्रसिद्ध कवी होता.

एकेकाळी विकायच्या कॉफी

शबाना आझमी रोज ३० रुपयांसाठी कॉफी विकायच्या, ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल. खरे तर शबाना यांची आई शौकत आझमी यांच्या 'कॅफी अँड आय मेमोयर' या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. शौकत आझमी यांचे २२ नोव्हेंबर, २०१९ रोजी निधन झाले. २००५ मध्ये त्यांनी हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकात पहिल्यांदाच शबानाने पेट्रोल स्टेशनवर तीन महिने ब्रू कॉफी विकल्याचे समोर आले आहे. ज्यासाठी त्यांना दररोज ३० रुपये मिळायचे. मात्र, त्यांच्या आईला याची माहिती नव्हती.

शबाना यांनी स्वामी (१९७७), जुनून (१९७९), स्पर्श (१९८०), अर्थ (१९८२) आणि पार (१९०८४) यांसारखे काही संस्मरणीय चित्रपट त्यांनी केले. शबाना यांनी १९८४ मध्ये जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न केले. जावेद शबाना आझमी यांचे वडील कैफी आझमी यांच्याकडे लेखन कौशल्य शिकायला जायचे. यादरम्यान शबाना आणि जावेद अख्तर एकमेकांच्या जवळ आले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, शबानाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. याचे कारण म्हणजे जावेद अख्तर आधीच विवाहित होते. त्यांना दोन मुले होती. मात्र शबाना यांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन जावेद अख्तर यांच्या सोबत लग्न केले होते.

SCROLL FOR NEXT