Jacqueline Fernandez : जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरशी करायचं होतं लग्न | पुढारी

Jacqueline Fernandez : जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरशी करायचं होतं लग्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गुरुवारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ला महाठग सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तू प्रकरणी चौकशी केली. तो २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात आहे. रिपोर्ट्सनुसार, बुधवारी जॅकलीनला ईओडब्ल्यूने ८ तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. असं म्हटलं जातं की, जॅकलीन आणि नोरा दोघीही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अप्रत्यक्षात सहभागी नाहीत. या सर्व घटनांदरम्यान, जॅकलीन सुकेश चंद्रशेखरशी लग्न करण्याचे प्लॅनिंग करत असल्याची माहिती समोर आलीय. (Jacqueline Fernandez)

चुकीचं घडत असतानाही जॅकलीनने दिली साथ

रिपोर्टनुसार, असं समजतं की, जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) शी इतकी प्रभावित होती की, ती तो गुन्हे करत असतानाही तिने त्याची साथ सोडली नाही, ती सुकेशच्या संपर्कात होती. विशेष पोलिस आयुक्त – ईओडब्ल्यू, रविंदर यादव यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, ‘जॅकलीन फर्नांडिससाठी अधिक अडचणी आहेत. कारण, सुकेशचा गुन्हेगारी इतिहास माहिती असतानाही तिने सुकेश चंद्रशेखरसोबत संबंध तोडले नाहीत. परंतु, नोरा फतेही मात्र वेगळी झाली.’

जॅकलिनच्या मॅनेजरला ८ लाखांची बाईक

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने जॅकलिन फर्नांडिसचा मॅनेजर प्रशांतकडून सुमारे ८ लाख किमतीची डुकाटी सुपरबाईक जप्त केली आहे. EOW अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, सुकेश चंद्रशेखरने ही दुचाकी प्रशांतला भेट दिली होती.

नोरा फतेही सुकेशला कधीच भेटली नाही

तथापि, नोरा फतेही सुकेश चंद्रशेखरला कधीही भेटली नाही. पण तो तिच्याशी दोनदा व्हॉट्सअॅपवर बोलला होता. गुन्हे शाखेने नोरासह तिचा मेहुणा मेहबूब उर्फ ​​बॉबी खान आणि पिंकी इराणी यांची चौकशी केली. सुकेश चंद्रशेखरच्या सूचनेनुसार इराणीनेच अभिनेत्रीला महागड्या भेटवस्तू देऊन संपर्क साधला होता, असे अहवालात म्हटले आहे.

नोराने गिफ्ट स्वीकारण्यास नकार दिला

सुकेश आणि लीना मारिया यांच्या मालकीच्या चेन्नई स्टुडिओच्या एका कार्यक्रमात त्यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. नोराला मोठी रक्कम आणि बीएमडब्ल्यू कार ऑफर करण्यात आली होती. पण चौकशीदरम्यान नोरा फतेहीने खुलासा केला की, तिने गिफ्ट स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याऐवजी बॉबी खानला देण्यास सांगितले.

Back to top button