Latest

Nayanthara ? : नयनताराने प्रेमात ओलांडलेल्या मर्यादा; ‘त्याच्या’ पत्नीला…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथची सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा ती दिग्दर्शक प्रभू देवाच्या प्रेमात वेडी होती. आज १८ नोव्हेंबर रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक किस्सा समोर आला आहे. जेव्हा ती आपल्या प्रेमासाठी आपल्या प्रियकराच्या पत्नीला कोट्यवधींची लाच देण्यासाठी गेली होती. मीडिया रिपोर्टनुसार, ती प्रभू देवासोबत लग्न करण्यासाठी त्याची पत्नी लताला लाच दिली होती. (Nayanthara)

नयनतारा प्रभूदेवाच्या प्रेमात वेडी

प्रभुदेवा आणि नयनतारा यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. प्रभूदेवाच्या प्रेमात नयनतारा मर्यादेपलीकडे जाण्यास तयार होती. असे म्हणतात की, तिला कोणत्याही किंमतीत त्याला मिळवायचे होते. या अभिनेत्रीमुळे दिग्दर्शकाच्या आयुष्यात वादळ आले. या अभिनेत्रीने प्रभुदेवाच्या आयुष्यात एन्ट्री केली आणि दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.

याविषयी बोलताना लता यांनी एकदा सांगितले होते की, तिच्या पतीनेही अभिनेत्रीसोबत दुसऱ्यांदा लग्न करण्याची परवानगी मागितली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभुदेवाची पत्नी लता हिने नयनतारावर अनेक गंभीर आरोप केले होते. ती म्हणाली होती की, 'अभिनेत्रीने प्रभू देवाला पैसे देण्यास आणि तिच्या कुटुंबाला भेटण्यास नकार दिला होता. त्यानंतर ती कोर्टात पोहोचली होती. जेणेकरून लता यांना त्यांचे हक्क परत मिळावेत.

नयनताराने मर्यादा ओलांडली

प्रभूदेवाला मिळवण्यासाठी नयनताराने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. असंही म्हटलं जातं की नयनतारा प्रेमात इतकी वेडी होती की ती काहीही करायला तयार होती. अशीही चर्चा रंगली की, तिने प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी त्य़ाच्या पत्नीला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. नयनताराने प्रभू देवाशी लग्न करण्यासाठी लता हिला ३ कोटी रुपये, काही सोन्याची नाणी आणि ८५ लाखांचा हिऱ्यांचा हार देण्याचा प्रयत्न केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT