मंचर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी जाहीर | पुढारी

मंचर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी जाहीर

मंचर; पुढारी वृत्तसेवा : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला, अशी माहिती प्रशासक पी. एस. रोकडे यांनी दिली. 1 हजार 730 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून, बुधवारी (दि. 7 डिसेंबर) अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने सध्या बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिलिंद सोबले यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

यामध्ये 14 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून, 23 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. 2 डिसेंबरपर्यंत हरकतींवर निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. संस्थानिहाय मतदार यादी पुढीलप्रमाणे : कृषी पतपुरवठा व बहुउद्देशीय सहकारी संस्था 699, ग्रामपंचायत 780, आडते व व्यापारी 132 आणि हमाल व तोलारी 119. याप्रमाणे एकूण मतदार 1730 असल्याची माहिती प्रशासक पी. एस. रोकडे यांनी सांगितली.

Back to top button