Latest

Farah Khan Bday: बॅकडान्सर होती फराह, आज आहे बॉलिवूडची टॉप कोरिओग्राफर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan Bday) ५७ वर्षांची झालीय. तिचा जन्म ९ जानेवारी, १९६५ रोजी मुंबईत झाला होता. चित्रपट आणि कोरिओग्राफीवरून चर्चेत राहणारी फराह आपल्या स्वभावावरूनही चर्चेत राहते. ती वैयक्तिक आयुष्यावरूनही चर्चेत राहीलीय. फराह आज ज्या ठिकाणी आहे. तिथवर पोहोचणं, इतकं सोपं नव्हतं. तिच्या वडिलांनी काढलेले कर्ज फेडण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला होता. घर खर्च चालवण्यासाठी फराहने काही लोकांची मदत घेत डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली. अनेक सेलिब्रिटींच्या मागे ती डान्स करू लागली. पाहुया तिचा बॅकडान्सर ते बॉलिवूडच्या टॉपची कोरिओग्राफरपर्यंतचा प्रवास. (Farah Khan Bday)

फराह खानच्या वडिलांचे नाव कामरान खान हे हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक आणि अभिनेते होते. त्यांनी आपले सर्व पैसे खर्च करून एक चित्रपट बनवला. यासाठी घरातील किंमती साहित्य आणि दागिनेही विकले. पण, दुर्देवाने हा चित्रपट फिलॉप ठरला. फराहच्या वडिलांचे निधन झाले. घराची संपूर्ण जबाबदारी फराह खानवर आली.

फराह खानला डान्स करणे खूप आवडायचं. ती मायकल जॅक्सनची मोठी फॅन आहे. तिच्या डान्स स्टाईल आणि मुव्हजची फराह वेडी झालीय. जेव्हा मायकल जॅक्सनचे गाणे थ्रीलर रिलीज झाले, त्यानंतर तिने डान्स शिकण्यास सुरुवात केली होती.

डान्स शिकण्यासाठी फराह खानच्या घरी कोणताही सुविधा नव्हती. म्हणून ती शेजाऱ्यांच्या घरात जाऊन टीव्हीवर डान्स पाहून शिकायची. तिने खूप मेहनत घेतली आणि तिचं भाग्य उजळलं.

चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करता-करता फराह स्टार्सना नवनवे डान्स स्टेप्स शिकवू लागली. 'जो जीता वहीं सिकंदर' चित्रपटामध्ये मुख्य कोरिओग्राफर सरोज खान यांची असिस्टेंट म्हणून तिने काम केले. सरोज काही कारणास्तव डान्स शिकवू शकल्या नाहीत, त्यामुळे ही संधी फराहला मिळाली आणि 'पहला नशा' गाण्यासाठी कोरिओग्राफी करण्याची संधी तिला मिळाली. या चित्रपटापासूनच तिचे भाग्य उजळले.

चित्रपट निर्मात्याशी केलं लग्न

फराह खानने चित्रपट निर्माता शिरीष कुंदरशी डिसेंबर, २००४ मध्ये लव्ह मॅरेज केले. शिरीष फराहपेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. फराहने आतापर्यंत १०० हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. याशिवाय तिने 'ओम शांती ओम',' मैं हूं ना' आणि 'हॅप्पी न्यू ईअर' यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT