Latest

B’day Amruta Khanvilkar : ‘चंद्रा’ अमृताविषयी ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमृता खानविलकर हे इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त नावांपैकी एक आहे. अमृताचा (B'day Amruta Khanvilkar) आज २३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम न-त्यांगना म्हणून अमृताची ख्याती आहे. मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज नृत्यांगनामध्ये अमृताच्या नावाचा समावेश आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी. (B'day Amruta Khanvilkar) अमृताने मराठीच चित्रपट नाही तर बॉलिवूडपटातही काम केलं आणि स्वत:ला एक अभिनेत्री म्हणून सिध्द केलं. अमृता खानविलकरचा जन्म २३ नोव्हेंबर, १९८४ रोजी पुणे येथे झाला. अशोक अकादमी, मुंबई आणि सेंट झेवियर्स युनिवर्सिटी, मुंबईतून तिने शिक्षण पूर्ण केले आहे.

अमृताने टीव्ही विश्वात इंडिया बेस्ट सिने-स्टार की खोजमधून पाऊल ठेवलं होतं. यानंतर तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. अमृता तिचा पती हिमांशू सोबत शो नच बलियेमध्ये देखील दिसली होती. ती या शोची विजेतीदेखील बनली होती. अमृताने 'डान्स इंडिया डान्सचा सीझन ६' देखील होस्ट केला आहे.

अमृताने आतापर्यंत अनेक हिंदी-मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. तिचा पहिला चित्रपट गोलमाल (मराठी) होता. यानंतर अनेक चित्रपटात काम करून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. अमृता मेघना गुलजारचा चित्रपट 'राजी'मध्येदेखील काम केलं होतं. यामध्ये तिची खूप महत्त्वाची भूमिका होती.

कट्यार काळजात घुसली, चंद्रमुखी, वेल डन बेबी, चोरीचा मामला, आणि डॉ. काशीनाथ घाणेकर, सतरंगी रे, साडे माडे तीन अशी मराठी चित्रपटातंमध्ये अभिनय करून अमृताने वाहव्वा मिळवलीय. तर राजी, मलंग, सत्यमेव जयते अशा हिंदीपटातही तिने काम केलं आहे.


मुक्ता बर्वे, आलिया भट्ट हे तिचे आवडते कलाकार आहेत. तर ती रणवीर सिंहची मोठी फॅन आहे. तसेच अंकुश चौधरी तिचा आवडता अभिनेता आहे. अमृताला वेगवगेळ्या पदार्थांची चव चाखायला आवडते. पेरी पेरी फ्राइज खायला तिला खूप आवडतं.

अमृताची बहिण आदिती खानविलकर आहे. अमृताने अदितीचे नाव आपल्या हातावर गोंदवले असून आदितीच्या नावाचा टॅटू काढला आहे.

SCROLL FOR NEXT