Latest

HBD Allu Arjun : ‘पुष्पा’ अभिनेता अल्लू अर्जुनच्या या ५ गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातून बॉलिवूड चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलेला अभिनेता अल्लू अर्जुनचा आज (८ एप्रिल) वाढदिवस (HBD Allu Arjun ) आहे. तो त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. तुम्हाला अल्लू अर्जुनच्या आयुष्याशी संबंधित या पुढील गोष्टी कदाचित माहिती नसतील. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याविषयीच्या या खास गोष्टी. (HBD Allu Arjun )

वयाच्या तिसऱ्या वर्षी चित्रपटात काम

अल्लू अर्जुनने वयाच्या तिसऱ्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. ८ एप्रिल, १९८२ रोजी एका तामिळ कुटुंबात त्याचा जन्म झाला. तो जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर दिसला तेव्हा तो केवळ ३ वर्षांचा होता. त्यावेळी १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विजेता' या चित्रपटात लहान अल्लूने बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर तो १९८६ मध्ये 'डॅडी' चित्रपटात दिसला. आणि नंतर अभिनेता म्हणून त्याने २००३ मध्ये 'गंगोत्री' चित्रपटातून पदार्पण केले.

लक्झरी व्हॅनिटी व्हॅनचा मालक

अल्लूने २०१९ मध्ये FALCON नावाची सुपर लक्झरी व्हॅनिटी व्हॅन खरेदी केल्याचे सांगितले जाते. या व्हॅनच्या आत महालाची झलक दिसते. त्याची किंमत सात कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.

अल्लू अर्जुन हा पुस्तकी किडा आहे

'पुष्पा' म्हणजेच अल्लू अर्जुनलाही वाचनाची खूप आवड आहे आणि त्याला त्याच्या ओळखीचे लोक पुस्तकी किडा म्हणतात.

allu arjun

अभिनेता तसेच उत्तम गायक

अल्लू अर्जुन हा एक उत्तम अभिनेताचं नव्हे तर उत्तम डान्सर आणि एक चांगला गायकही आहे. २०१६ च्या तेलुगु चित्रपट सारैनोडूसाठी त्याने एक गाणे देखील गायले आहे.

पत्नीच्या घरच्यांनी नाकारलं होतं नातं

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती. असे म्हटले जाते की, त्यावेळी स्नेहा अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी घेऊन परत आली आणि अल्लू अर्जुन तामिळ चित्रपटांचा स्टार बनला. स्नेहा ही हैदराबाद येथील एका बिझनेसमनची मुलगी आहे. पण तिच्या घरच्यांना अल्लूसोबतचे तिचे नाते आवडले नव्हते. अल्लुने जेव्हा स्नेहाच्या घरी आपल्या नात्याविषयी सांगितले होते, तेव्हा तिच्या वडिलांनी नकार दिला होता.

(photos –alluarjunonlineofficial_boss insta वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT