सांगलीत पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

सांगलीत पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पोलीस हवालदार रामचंद्र बिरणगे (वय ४६, रा. विश्रामबाग पोलीस लाईन) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी (दि. ८) रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र बिरणगे हे सांगली शहर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून काम करतात. चार दिवसापूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नी आरती यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत त्यांनी सुजाता तानाजी हेगडे या संशयित महिलेविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार सुजाता हेगडे या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेनंतर रामचंद्र बिरणगे यांनी गुरुवारी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news