Latest

सरकारी नोकरी : महिला बाल विकास विभागात १३८ जागांसाठी भरती

backup backup

महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात १३८ जागांसाठी जाहिरात निघाली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती होणार आहे. या जागेसाठी अर्ज १८ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहेत. ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत. अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती आहे. एकुण १३८ जागांसाठी ही भरती होणार आहे.

पात्रता

उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या दिनांका दिवशी ३५ हून कमी नसावे. उमेदवार हे बालमानशास्त्र, मनोविकृती शास्त्र, समाजशास्त्र, समाज, मानवी आरोग्य यापैकी कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असावे. पात्र उमेदवारांना महिला बाल विकास विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.

अटी

पात्रतेनूसार वय, अनुभव, शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवार हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा. निवड प्रक्रियेपूर्वी सर्व उमेदवारांनी पोलिस विभागाकडून चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यात त्यांनी अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी विहित नमुन्यातील हमीपत्रे/संमतीपत्रे देणे बंधनकारक आहे.

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जिल्ह्यांच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज जमा करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२१ आहे. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

हेही वाचलत का?

SCROLL FOR NEXT