पुढारी ऑनलाईन डेस्क : मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील मतदान पार पडल्यानंतर आज विविध एक्झिट पोल्स समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या प्राथमिक निकालांनुसार, पंजाब वगळता, भारतीय जनता पक्ष (भाजप) उर्वरित चार राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा (Goa Exit Poll) या राज्यांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. मात्र, उत्तराखंड आणि गोव्यात ते बहुमताच्या आकड्यांपेक्षा मागे पडल्याचे दिसते.
एबीपी सी व्होटर एक्झिट पोलने गोव्यात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली आहे. एक्झिट पोलनुसार, 40 सदस्यांच्या विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसते. भाजपला 13-17 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 12-16 तर आम आदमी पार्टीला 1-5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. टीएमसीला ५-९ जागा मिळू शकतात, तर इतरांना ०-२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या ७ व्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पूर्ण झाल्यामुळे, लोकांच्या नजरा आता १० मार्च रोजी येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत.
एक्झिट पोलच्या प्राथमिक निकालांनुसार पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातून जागा आम आदमी पक्षाच्या (आप) जातील असे दिसते. उत्तराखंड आणि गोव्यात भाजपला काँग्रेसकडून चुरशीची लढत मिळू शकते, मणिपूरमध्ये भाजपला पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश मिळू शकते.
हे ही वाचलं का ?