EXIT POLL : पाचपैकी ४ राज्यांमध्ये अब की बार भाजप सरकार ! | पुढारी

EXIT POLL : पाचपैकी ४ राज्यांमध्ये अब की बार भाजप सरकार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील मतदान पार पडल्यानंतर आज विविध एक्झिट पोल्स समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या प्राथमिक निकालांनुसार, पंजाब वगळता, भारतीय जनता पक्ष (भाजप) उर्वरित चार राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. मात्र, उत्तराखंड आणि गोव्यात ते बहुमताच्या आकड्यांपेक्षा मागे पडल्याचे दिसते.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या ७ व्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पूर्ण झाल्यामुळे, लोकांच्या नजरा आता १० मार्च रोजी येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत. यावेळी निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे मानले जात आहे.

एक्झिट पोल २०२२ च्या अंदाजानुसार, भाजप यूपीमध्ये वापसी करेल. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर समोर आलेल्या तीन प्राथमिक एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) बाजी मारताना दिसत आहे. 200 पेक्षा जास्त जागा मिळवतील असा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार, भगवा पक्ष आपल्या मित्रपक्षांसह बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 202 जागांपर्यंत सहज पोहोचत असल्याचे दिसते.

पंजाबमध्ये AAP, तर UP मध्ये BJP विजयाच्या वाटेवर

एक्झिट पोलच्या प्राथमिक निकालांनुसार पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातून जागा आम आदमी पक्षाच्या (आप) जातील असे दिसते. उत्तराखंड आणि गोव्यात भाजपला काँग्रेसकडून चुरशीची लढत मिळू शकते, मणिपूरमध्ये भाजपला पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश मिळू शकते.

एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये ‘आप’ पक्षाला ५६-६१ जागा मिळताना दिसत आहे. यावरून पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून आम आदमी पार्टी उदयास येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पंजाबमधील मुख्यमंत्री पदाची माळ आम आदमी पार्टीच्या भगवंत मान यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलनुसार दुसऱ्या क्रमांकावर काॅंग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर भाजप असल्याचे दिसत आहेत. भाजपाचा विचार करता, त्यांच्या वाट्याला पंजाबमध्ये १-६ जागाच मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एक्झिट पोलच्या प्राथमिक निकालांनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपची पुनरागमन होऊ शकते, तर पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातून जागा आम आदमी पक्षाच्या (आप) जातील असे दिसते. उत्तराखंड आणि गोव्यात भाजपला काँग्रेसकडून चुरशीची लढत मिळू शकते, मणिपूरमध्ये भाजपला पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश मिळू शकते.

ईटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार (UP Exit Poll), यूपीमधील ४०३ जागांपैकी भाजप आणि मित्रपक्ष २३० ते २४५ जागा जिंकणार आहेत. युपीत दुस-या क्रमांकावर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष राहिल. त्यांना १५० ते १६५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला केवळ २ ते ६ आणि बसपाला ५ ते १० जागांवरच समाधान मानावे लागणार आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button