UP Exit Poll : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपचे ‘कमळ’ फुलणार! एक्झिट पोलचा अंदाज

UP Exit Poll : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपचे ‘कमळ’ फुलणार! एक्झिट पोलचा अंदाज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ७ व्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. याचबरोबर सर्व टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता लोकांच्या नजरा आता १० मार्च रोजी येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत. यावेळी निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे मानले जात आहे. एक्झिट पोल २०२२ च्या (UP Exit Poll) अंदाजानुसार, यूपीमध्ये पुन्हा भाजप सत्तेत येणार असून योगी आदित्यनाथ हाती 'कमळ' घेत दुस-यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसतील.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर समोर आलेल्या तीन प्राथमिक एक्झिट पोलचे (UP Exit Poll) निकाल समोर आले आहेत, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) बाजी मारताना दिसत आहे. भाजपला २०० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक २०२ जागांचा आकडा भाजप आपल्या मित्रपक्षांसह सहज गाठेल, अशी शक्यता आहे.

ईटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार (UP Exit Poll), यूपीमधील ४०३ जागांपैकी भाजप आणि मित्रपक्ष २३० ते २४५ जागा जिंकणार आहेत. युपीत दुस-या क्रमांकावर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष राहिल. त्यांना १५० ते १६५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला केवळ २ ते ६ आणि बसपाला ५ ते १० जागांवरच समाधान मानावे लागणार आहे.

UP Exit Poll Resuit :

NewsX-Polstrat एक्झिट पोलनुसार भाजप आणि मित्रपक्षांना २११ ते २२५ जागा, काँग्रेसला चार ते सहा आणि बसपाला १४ ते २४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला १४६ ते १६० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलने भाजप आणि मित्रपक्षांच्या खात्यात २४०, समाजवादी पार्टी आणि मित्रपक्षांना १४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसला चार आणि बसपाला १७ जागा जाण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलच्या निकालांवर विश्वास ठेवला, तर 'मी मुलगी आहे, लढू शकते' (मैं लड़की हूं, लड़ सकती हूं) या प्रियंका गांधींचा घोषणेचा काँग्रेसला जागांच्या बाबतीत विशेष फायदा होईल असे वाटत नाही. एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार (तिन्ही एजन्सीच्या एक्झिट पोलची सरासरी) भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना २३२ जागा, काँग्रेस ४ आणि बसपा १७ जागा मिळतील, तर समाजवादी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना १५० जागा मिळू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news