Latest

The Kashmir Files : महाराष्ट्रात राहून मराठमोळी पल्लवी जोशीने काश्मीरचा मुद्दा हाताळला कसा?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री पल्लवी जोशी हिचे पती विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाची चर्चा आहे. खुद्द पल्लवी जोशी हिने या चित्रपटात भूमिका साकारलीय. हा चित्रपट साकारण्याआधी पल्लवीने काश्मीर पंडितांशी बोलून अभ्यासही केला. सातशेहून अधिक पीडितांवरील अत्याचार पाहून या मराठमोळ्या अभिनेत्रीचं मन हेलावलं होतं. पल्लवी जोशीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं होतं की, हा चित्रपट सुरू करण्याआधी त्यांनी पीडित कुटुंबाशी चर्चा केली होती. त्यांचे दु:ख ऐकून अंगावर काटा आाल होता. महाराष्ट्रात राहून पल्लवीने काश्मीरचा मुद्दा हाताळला.

१९९० मध्ये झालेली काश्मीर हिंसा या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शिवाय द्वंददेखील दाखवण्यात आलाय. त्यावेळेची पिढी आणि आजच्या पिढीत हे द्वंद सुरू आहे. हा चित्रपट किती सत्य घटनेवर आधारित आहे आणि किती काल्पनिक आहे. हे पल्लवीने सांगितलंय.

७०० हून अधिक पीडित कुटंबीयांशी चर्चा

हा चित्रपट समाजाचं आरसा आहे. समाजाशी संबंधित कोणताही मुद्दा दाखवताना त्या घटनेच्या सत्यतेची पडताळणी करणं, हे या चित्रपटाची जबाबदारी आहे. पल्लवीने सांगितल्यानुसार, हा चित्रपट करण्याआधी या गोष्टींची काळजी घेण्यात आली होती. त्यासाठी जवळपास ७०० हिंसाचाराने पीडित कुटुंबीयांशी चर्चा करण्यात आली होती. या कुटुंबावी काश्मीरमधील हिंसाचार पाहिला आणि झेललाही होता. त्यांना विस्थापित व्हावं लागलं होतं.

बालकलाकार, अभिनेत्री, सूत्रसंचालक, निर्माती…

४ एप्रिल, १९६९ रोजी पल्लवीचा जन्म मुंबईत झाला. बालपणापासूनचं रंगमंचावर तिने काम केलंय. बालकलाकार म्हणून 'बदला' आणि 'आदमी सडक का' या दोन चित्रपटात तिने अभिनय केला आहे. 'दादा' या चित्रपटात एका कुविख्यात गुंडाला सुधारणाऱ्या अंध मुलीची भूमिका तिने साकारली. हा चित्रपट १९७९ साली रिलीज झाला होता.

छोट्य़ा पडद्यावरील अंताक्षरी या कार्यक्रमामुळे पल्लवी घराघरात पोहोचली. त्या कार्यक्रमात अनु कपूर यांच्यासोबत ती सूत्रसंचालन करत होती. इतकेचं नाही तर पुढे तिने सारेगमप लिटल चॅम्प्सचेही सूत्रसंचालन केले.

द काश्मीर फाईल्स

पल्लवी प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याशी विवाहबंधनात अडकली. विवेक अग्निहोत्री यांनी 'चॉकलेट', बुद्धा इन ट्रॅफिक जाम', 'हेट स्टोरी' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना दोन मुले आहेत. बुद्धा इन ट्रॅफिक जॅम या चित्रपटात तिने स्वत: अभिनय केला होता. पल्लवी जोशीने कारकिर्दीच्या सुरूवातीलाच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आणि शबाना आझमी यांच्यासोबत 'भारत एक खोज' या मालिकेत काम केले होते. यातील तिच्या दमदार अभिनयाने छाप सोडली.

बुद्धा इन ट्रॅफिक जॅम

पल्लवीने अनेक टीव्ही मालिका, जाहिरातीमध्ये काम केलयं. अल्पविराम या मालिकेतील तिच्या अभिनयाने वाहव्वा मिळवली होती. असंभव आणि अनुबंध या दोन मालिकांची निर्मितीही तिने केलीय. या दोन मालिका चांगल्या गाजल्या होत्या.

द काश्मीर फाईल्समुळे चर्चेत

द काश्मीर फाईल्स नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट काश्मीर विस्थापित झालेल्या लोकांचं दु:ख, वास्वव चित्रण सादर करणारा आहे. पल्लवीची यात दमदार भूमिका आहे. काश्मीरी पंडितांवरील अत्याचारांची कहाणी यात दाखवण्यात आलीय.

पल्लवीचे उत्कृष्ट चित्रपट –

ताश्कंद फाईल्समध्ये पल्लवीने दमदार अभिनय केला होता.

१९९१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'सौदागर'मध्ये भूमिका साकारली होती.

१९९२ मध्ये रिलीज झालेला 'तहलका'ने धुमाकूळ घातला होता.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

चित्रपट, शॉर्टफिल्म्स-

द दिल्ली फाईल्स, द लास्ट शो, प्रेशर कूकर, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, रिटा, गांधी से महात्मा तक, इन्सानियत.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT