बेळगाव : कैद्याना भेटण्यास नातलगांना परवानगी | पुढारी

बेळगाव : कैद्याना भेटण्यास नातलगांना परवानगी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर कारागृहात शिक्षा भोगणार्‍या कैद्यांच्या नातलगाना भेटीसाठी निर्बंध घारण्यात आले होते. ते निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. दि. 21 पासून कैद्यांची भेट घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र यासाठी पुर्व सुचना देऊन परवानगी घ्यावी लागणार आहे.

कोरोना संसर्गामुळे कैद्यांच्या नातलगांना भेटी गाठी घेण्यास बंदी घालण्यात आली होती. आता कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाल्याने नियमात बदल करण्यात आला आहे. मात्र कैद्याची भेट घेण्यापुर्वी संबंधितांना पुर्व परवानगी घेण्याची अट घालण्यात आली आहे.
कैद्याच्या नातलग, मित्र, वकिलांनी भेटी पुर्वी कारागृहाच्या ई मेल, वाट्सअ‍ॅप, दुरध्वनी,वरुन संपर्क साधुन परवानगी घ्यावी लागणार आहे.

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच भेटीसाठी परवागी देण्यात येणार आहे. दोन डोस न घेतलेल्यांना, कोरोना लक्षण असणार्‍या भेटीची परवानगी देण्यात येणार नसल्याचे कारगृह अधिक्षकांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी कारागृहाच्या 0831 2405275 या क्रमांकावर संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button