Latest

shibani dandekar wedding : शिबानीचं नाव बदललं, Liplock फोटो व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन ; बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत गेल्या १९ फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात ( shibani dandekar wedding ) अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर सध्या शिबानी दांडेकरने आपलं नाव बदलून शिबानी दांडेकर-अख्तर असे केल्याचे माहिती समोर आली आहे.

जवळपास ४ वर्षे डेट केल्यानंतर फरहान-शिबानी यांनी १९ फेब्रुवारी रोजी दोघे लग्नबंधनात अडकले. हे लग्न अख्तर फॅमिलीच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये पार पडले. या कपलने काही हटके करण्याचा निर्णय घेतला. शिबानी आणि फरहानने Vow तसेच रिंग सेरेमनी करून सात जन्मापर्यंत एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला.!

या लग्नसोहळ्यात सूटेड बूटेड लुकमध्ये फरहान हँडसम तर शिबानी रेड अँड बेज कलरच्या गाऊनमध्ये स्टनिंग दिसत होती. वेडिंग लुकमध्ये शिबानीने सुंदर रेड कलरचा ड्रेस घातला होता. त्यांच्या लग्नाचे आणखी काही फोटो व्हायरल झाले आहेत.

शिबानीने शेअर केलेल्या फोटोत काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दिसत आहेत. या फोटोतील खास म्हणजे, ते दोघेही लिपलॉक करताना दिसले आहेत. यासोबत शिबानीने लग्नानंतर  ( shibani dandekar wedding ) आपलं नाव बदलून शिबानी दांडेकर- अख्तर असे ठेवल्याचे समजले आहे. इंस्टाग्राम बायोनुसार (Instagram Bio), शिबानी दांडेकर-अख्तर (Shibani Dandekar- Akhtar) असे नाव शिबानीने ठेवलं आहे. शिबानी आणि फरहान रोमॉटिक अंदाजात खूपच सुंदर दिसत आहेत.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूड स्टार्संनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यातील एका युजर्सने 'दोघांमध्ये खूप प्रेम आहे हे दाखवण्याची गरज नाही' असे लिहिले आहे. दुसऱ्या एका युजर्सने लग्नाच्या दोघांना पुढील आयुष्यासलाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिबानी आणि फरहानची पहिली भेट २०१५ मध्ये एका रिअॅलिटी शो दरम्यान झाली होती. फरहान 'आय कॅन डू इट' रिअॅलिटी शो होस्ट करत होता, तर शिबानी दांडेकर त्या शोमध्ये एक स्पर्धक होती. शो दरम्यानच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. शिबानीने फरहान अख्तरचे नावाचा टॅटू मानेवर काढून प्रेमाची कबूली दिली होती. यानंतर याचे नात्याच्या चर्चांना उधान आलं. जवळपास ४ वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT