Latest

aashram-3 : ईशा गुप्ताने इंटिमेट दृश्यांवर सोडलं मौन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

ईशा गुप्ताने आश्रम ३ मधील इंटिमेट सीन्सबद्दल अखेर मौन सोडले आहे. 'आश्रम ३' मध्ये बाॅबी देओलसोबत जबरदस्त इंटिमेट सीन्स दिल्यामुळे तिची चर्चा चांगली रंगली होती. या मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये ती सोनिया नावाच्या व्यक्तीरेखा साकारत आहे. या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच ईशाने बॉबी देओलसोबतच्या तिच्या इंटिमेट सीन्सवर आता मौन सोडले आहे. शूटिंगदरम्यान काय घडले ते तिने सांगितले.

प्रकाश झा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली 'आश्रम ३' वेब सीरीज MX Player वर ३ जून रोजी रिलीज झाली आहे. ढोंगी बाबा निरालाच्या अवतारात बॉबी देओलने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'आश्रम'चा हा तिसरा सीझन इंटिमेट सीन्सने भरलेला आहे.

विशेष म्हणजे यावेळी स्क्रीनवर ग्लॅमर आणण्यासाठी त्रिधा चौधरीसोबत ईशा गुप्ताही आहे. ईशा पहिल्यांदाच या आश्रम वेब सिरीजचा भाग बनली आहे. सिरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून ईशा गुप्ताची स्टाईल आणि बॉबी देओलसोबतच्या तिच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा होत आहे. आता खुद्द ईशा देओलने या इंटिमेट सीन्सवर मौन सोडले आहे.

माजी मिस इंडिया ईशा गुप्ता संवाद साधताना म्हणाली, 'अशा दृश्यांबद्दल आरामदायक असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत १० वर्षे काम केले आहे, तेव्हा असे इंटिमेट सीन्स करताना तुम्हाला अजिबात संकोच वाटत नाही. लोकांना वाटते की पडद्यावर जवळीक ही एक मोठी गोष्ट आहे. मात्र, तसे नाही. या बाबतीत आम्ही खूप मोकळे आहोत.'

ईशा गुप्ताच्या मते, पडद्यावर अशी दृश्ये अधिक कठीण आहेत. ती म्हणते, "कदाचित जेव्हा मी पहिल्यांदा इंटिमेट सीन केले तेव्हा ते माझ्यासाठी कठीण होते. पण आता तसे नाही. जेव्हा तुम्ही छान आणि प्रौढ लोकांसोबत असे सीन शूट करता तेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. मला वाटतं अजूनही चित्रपटात ज्या प्रकारे जवळीक दाखवली जाते तशी दृश्ये OTT वर दाखवली जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल कसे वाटते यावर ते अवलंबून आहे.

या सीन्सवर बॉबी देओलची प्रतिक्रिया काय आहे, असे जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले तेव्हा ईशा म्हणाली, 'मला खात्री आहे की बॉबीनेही याआधी अनेकदा इंटिमेट सीन चित्रीत केले आहेत. मला खात्री आहे की आश्रममधील इंटिमेट सीनसाठत तो कंफर्ट राहिला असेल. स्क्रिप्टच्या गरजेनुसार अशी दृश्ये तुम्हाला चित्रीत करावीच लागतात. त्यामुळे आम्ही जे काही सीन केले आहेत, ते आम्ही योग्य ठरवतो असे मला वाटते. प्रेक्षकांनाही ते हवेहवेसे असतात.'

'आश्रम 3'मध्ये ईशा गुप्ताची एन्ट्री एका इमेज बिल्डरच्या भूमिकेत झाली आहे. तिच्या पात्राचे नाव सोनिया आहे. मालिकेत ती तिच्या स्वार्थामुळे बाबा निरालाला भुरळ घालताना दिसत आहे. मालिकेतील तिच्या बोल्ड, मोहक आणि ग्रे शेडच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना ईशा म्हणते, "सोनियाला माहित आहे की तिला काय हवे आहे, म्हणून ती आपल्याला काय हवे आहे ते मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT