Nora Fatehi Shahid Kapoor : नोरा फतेहीने घेतली शाहिद कपूरची ‘शाळा’! | पुढारी

Nora Fatehi Shahid Kapoor : नोरा फतेहीने घेतली शाहिद कपूरची ‘शाळा’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी नोरा फतेही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरलही होतात. ज्यावर तिचे चाहते लाईक्स आणि हटके कमेंटचा पाऊस पाडतात. दरम्यान, नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अभिनेता शाहिद कपूरला डान्स शिकवताना दिसत आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. ज्याला सोशल मीडिया यूजर्सनी भरभरून पसंती दिली आहे. (Nora Fatehi Shahid Kapoor)

व्हायरल भयानीच्या () इन्स्टाग्राम अकौंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून तो व्हायरल होत आहे. यात नोरा-शाहिदचा हात धरून ती त्याला डान्स स्टेप्स करायला सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी शाहिद डान्स स्टेप्स करण्याचाही प्रयत्न करत आहे. दरम्यान, शाहिद मजेशीर पद्धतीने एक-एक स्टेप करून दाखवत आहे. त्याच वेळी, त्याच्या मागे एक मोठी स्क्रीन दिसत आहे. ज्यामध्ये आयफा अवॉर्डचे छायाचित्र दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कळते की हे दोघे आयफासाठी डान्स रिहर्सल करत आहे. या दोघांच्या या व्हिडिओला काही वेळातच हजारो लाईक्स मिळाले आहेत. (Nora Fatehi Shahid Kapoor)

विशेष म्हणजे अबुधाबी येथे आयफा 2022 चे (IIFA 2022) आयोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार सलमान खान, शाहिद कपूर, सारा अली खान, मनीष पॉल, फराह खान, नोरा फतेही यांसारखे अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अबुधाबीला पोहोचले आहेत. प्रत्येकजण या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे. त्याच वेळी, अनेक स्टार्स तयारीत व्यस्त आहेत. यापूर्वी, सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांचे फोटो व्हायरल झाली होती. जिथे एकीकडे सारा ‘चका चक’ (Chaka Chak) गाण्यावर परफॉर्म करणार आहे. तर अनन्या पांडेही आयफामध्ये तिचा पहिला परफॉर्मन्स देणार आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ‘सामी’ (Sami Sami) गाण्यावर डान्स करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button