Latest

Earthquake : जपान भूकंपानं हादरला, २ मृत्यू, बुलेट ट्रेन रुळावरून घसरली, २० लाख घरांचा वीज पुरवठा खंडीत

backup backup

टोकियो : पुढारी ऑनलाईन

जपानची राजधानी टोकियो जवळ बुधवारी भुकंपाचे जोरदार हादरे बसले. उत्तर पूर्व जपानच्या मोठ्या भागांना या भूकंपाने हादरवून सोडले. तेथील स्थानिक वेळेनुसार रात्री ८ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ इतकी होती. जपानमध्ये किनारपट्टीवरील फुकुशिमाला या भागामध्ये याचा मोठा फटका बसला आहे. या शक्तिशाली भूकंपात दोन लोकांचा मृत्यू आणि जवळपास डझनभर लोक जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपाच्या हादऱ्याने बुलेट ट्रेनही रुळावरून घसरली. तसेच जवळपास वीस लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू फुकुशिमा भागाच्या किनारपट्टीपासून 60 किलोमीटर खोलीवर होता. रात्री 11:36 वाजून 10 मिनिटांनी हा भूकंप झाला. यानंतर तात्काळ ईशान्य किनारपट्टीच्या काही भागांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला.

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्रीच्या भूकंपानंतर किती नुकसान झाले आहे याची माहिती अधिकारी घेत आहेत. ईशान्य जपानच्या काही भागांमध्ये एक मीटरपर्यंत लाटा उसळतील, अशा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम हा किनारपट्टीवरील भागात दिसून आला. काही भागात पाण्याची पातळी नेहमीपेक्षा 30 सेंटीमीटरने जास्त नोंदवली गेली आहे.

संपूर्ण रात्रभर या भागात अनेक छोटे धक्के जाणवत राहिले. त्याचबरोबर अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनूसार, अणु प्रकल्पावर याचा फारसा परिणाम झाला नाही. वारंवार होणार्‍या भूकंपापासून होणार्‍या विनाशापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने लोक सुरक्षित ठिकांणांचा आसरा घेत आहेत.

सरकारचे प्रवक्ते हिरोकाझू मात्सुनो यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, "आम्ही नुकसान किती प्रमाणात झाले याचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."

"पहिल्या भूकंपानंतर दोन दिवसांनी मोठे आफ्टरशॉक येतात, त्यामुळे कृपया कोणत्याही कोसळलेल्या इमारतींपासून आणि इतर असुरक्षित असलेल्या ठिकाणांपासून दूर रहा.," असे आवाहनदेखील त्यांनी केले. .

त्याचबरोबर फुकुशिमाच्या प्रदेशात आणि शेजारच्या मियागीमध्ये 90 हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती तेथील अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने दिली.

हा भूकंप फुकुशिमा किनार्‍यापासून ६० किलोमीटर (३७ मैल) खोल अंतरावर झाला, दरम्यान काही मिनिटांनी त्याच भागात ६.१-रिश्टर स्केलचा आणखी एक जोरदार हादरा देखील बसला, असे जपानच्या हवामान संस्थेने सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT