Latest

Sasoon Hospital Drug Racket : ड्रग माफिया ललितची आई चिंतेत, तर वडील…अशी झालीय कुटुंबाची अवस्था

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझा मुलगा ललित हा ड्रग्जचे काम करतो, हे ऐकून त्याच्या वडीलांना मोठा धक्काच बसला आहे. त्यांची प्रकृतीच बिघडली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ललित पाटीलच्या आई भाग्यश्री पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, आम्ही लक्ष देऊनही आमची मुले असे झाले, असा सल्ला भाग्यश्री यांनी दिला आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालातून पळून गेल्यानंतर पुण्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता या प्रकरणात राजकीय नेत्यांनीदेखील उडी घेतली आहे. त्यातच ललितच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्याची राज्यभर चर्चा होत आहे. ललिताची आई म्हणाली माझ्या दोन्ही मुलांशी मागील तीन ते चार वर्षांपासून आमचे कोणतेही संबंध नव्हते, माझी मुलं ड्रग्ज प्रकरणात आहेत. हे मला बातम्यांमधून समजले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर माझ्या पतीला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या :

त्या पुढे म्हणाल्या, ललित आमच्या संपर्कात होता तेव्हा तो एका एका वाईन कंपनीत काम करायचा. त्यानंतर त्याने परदेशात शेळी विक्रीचा व्यवसाय ३-४ वर्षे केला. त्यानंतर त्याच्याशी आमचा संपर्क राहीला नाही. आता अचानक ललित आणि भूषण हे अमली पदार्थ तस्करीत असल्याचे कळाले. पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली असून, त्यात पेनड्राइव्ह सापडले आहे. आमचे मोबाईलही पोलिसांनी केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भूषणदेखील आमच्या संपर्कात नाही. भूषणचं लग्न झालं असून त्याची पत्नी गरोदर आहे, अशी माहिती भूषण आणि ललितच्या आईने दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुणे पोलिसांच्या गून्हे शाखा विभागाकडून ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे दोन कोटींचे अंमली पदार्थ, एक किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन जप्त करण्यात आले होते. हे उघड झाल्यानंतर रुग्णालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन ड्रग्स तस्कर ललित पाटील फरार झाला. ललित पाटील हा मूळचा नाशिकच्या उपनगर परिसरात वास्तव्यास होता. या प्रकरणातील तपासासाठी मुंबई पोलिसांचे पथक नाशिक मध्ये आले होते. पोलिसांनी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटीलच्या ड्रग्स कारखान्यावर छापा टाकत.

सुमारे ३०० कोटीपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करत कारखाना उध्वस्त केला आहे. ललित पाटील येरवडा मध्यवर्ती कारागृहात तसेच ससून रुग्णालयात असताना त्याचा भाऊ भूषण पाटील ड्रग्जचा व्यापार पाहत होता. नाशिकच्या शिंदे गाव येथे त्याने साधीदारांच्या मदतीने मेफेड्रॉनच्या अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्याचे मुंबई पोलिसाच्या छाप्यात उघडकीस आले. या संपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर ललित आणि भूषण पाटीलच्या आईने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील अजूनही फरार

ड्रग्ज माफिया ललित पटील ससूनमधून फरार झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. याच ड्रग्ज रॅकेटमध्ये ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील देखील असल्याचं समोर आलं. त्यानंतर 10 सप्टेंबर ला भूषण पाटील आणि त्याच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलं असून 16 तारखेपर्यंत त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार असून त्याचा शोध पुणे पोलीस घेत आहे.

ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण?

ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा केमिकल इंजिनिअर असून तो मेफेड्रोन ड्रग्स तयार करायचा आणि त्याचा मित्र अभिषेक बलकवडे हा या मेफेड्रोन ड्रग्सची वाहतूक करून योग्य स्थळी नेऊन पोहचवत असायचा. त्यानंतर ललित पाटील या मेफेड्रोन ड्रग्सची डिल करत. या तीन जणांची साखळी अनेकांपर्यंत मेफेड्रोन पोहचवत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT