Latest

Rajinikanth : कोण आहे ‘तो’ ड्रायव्हर, ज्यांना रजनीकात यांनी समर्पित केला फाळके पुरस्कार

स्वालिया न. शिकलगार

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि 'थलायवा' रजनीकांत (Rajinikanth) यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात (67th National Film Awards) रजनीकांत (Rajinikanth) यांना सन्मानित करण्यात आले. रजनीकांत यांनी हा पुरस्कार त्यांच्या जिवलग मित्राला समर्पित केला पण, तो मित्र आहे तरी कोण? आणि रजनी यांनी त्यांना हा पुरस्कार समर्पित केला.

यावेळी, रजनीकांत यांनी मित्राची आठवण काढत खूप भावूक गोष्ट सांगितली. रजनीकांत यांनी सांगितले की, राज बहादुर (Raj Bahadur) यांनी रजनीकांत यांचं सर्वात आधी ॲक्टिंग टॅलेंट ओळखलं होतं. आणि रजनी यांना चित्रपटात जाण्यासाठी प्रोत्साहन केलं होतं. त्यावेळी रजनीकांत चित्रपटातदेखील आलेले नव्हते. त्यावेळी रजनीकांत एक बस कंडक्टर म्हणून काम करत होते.

बस कंडक्टर होते रजनीकांत

रजनीकांत यांचे मित्र राज बहादुर कर्नाटकात एक बस ड्रायव्हर आहेत. रजनीकांत जेव्हा बस कंडक्टर होते, त्यावेळी त्यांना कधीही वाटले नव्हते की, ते अभिनेता होतील. परंतु, त्यांचे मित्र राज बहादुर यांच्या नजरने त्यांना ओळखले. त्यांनी रजनी यांना चित्रपटात जाण्यासाठी प्रोत्साहित केले. रजनीकांत आपल्या मित्रामुळे चित्रपटात आले आणि मोठे स्टार झाले.

स्टार झाले पण, विसरली नाही मैत्री

इतके मोठे स्टार झाल्यानंतरदेखील रजनीकांत आपल्या बस ड्रायव्हर मित्राला विसरले नाहीत. त्यांची ५० वर्षांची जुनी मैत्री आहे. ते राज बहादुरचं आहेत, ज्यांनी शिवाजी राव गायकवाड यांना 'रजनीकांत' बनवलं. आणि तमिळ भाषा देखील शिकवली.

५० वर्षांची जुनी मैत्री

एका मुलाखतीत, राज बहादुर यांनी रजनीकांतसोबतच्या मैत्रीचे किस्से सांगितले. बहादुर म्हणाले, 'आमची मैत्री ५० जुनी आहे. मी रजनीकांत यांना १९७० मध्ये भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी बस कंडक्टर म्हणून ड्यूटी जॉईन केली होती. मी एक ड्रायव्हर होतो. आमच्या संपूर्ण ट्रान्सपोर्ट स्टाफमध्ये रजनीकांत बेस्ट ॲक्टर होते. जेव्हा डिपार्टमेंटमध्ये सांस्कऋतिक कार्यक्रम असायचा. तेव्हा रजनी स्टेजवर परफॉर्म करत होते.'

रजनी यांना अभिनय शिकण्यास पाठवले

राज बहादुर म्हणाले, 'तेव्हा मी रजनीयांना चेन्नईत जाऊन ॲक्टिंग स्कूल जॉईन करण्यासाठी सांगितले. २ वर्षांच्या ॲक्टिंग कोर्सनंतर इन्स्टिट्यूटने एक कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये रजनीकांत यांनी परफॉर्म केलं होतं. प्रसिध्द चित्रपट निर्माते बालाचंदर तेव्हा प्रमुख पाहुणे होते. रजनी यांचा परफॉर्मन्स पाहून ते त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले, तमिळ शिक.

तेव्हा रजनी माझ्याकडे आले आणि मला ही गोष्ट सांगितली. बालाचंदर यांनी रजनीकांत यांना अन्य कुठल्याच गोष्टी सांगितल्या नव्हत्या. केवळ तमिल शिक असं सांगितलं होतं. मी रजनी यांना म्हणालो, काळजी करू नकोस. आतापासून रोज माझ्याशी तमिळमध्ये बोलत जा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT