Latest

CSIR SO and ASO Recruitment 2023 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; CSIR मार्फत ४४४ पदांची भरती, जाणून घ्या अधिक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मार्फत ४४४ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. CSIR ने विभाग अधिकारी (SO) आणि सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट csir.res.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी २०२४ असून शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी उमेदवारांनी अर्ज पुरेशा वेळेआधी भरावा. (CSIR SO and ASO Recruitment 2023)

महत्वाच्या तारखा (CSIR SO and ASO Recruitment 2023) :

अर्ज नोंदणी शेवट तारीख : १२ जानेवारी २०२४
परीक्षेची अंदाजे तारीख : फेब्रुवारी २०२४

रिक्त पदांचा तपशील :

CSIR ने एकूण ४४४ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी ७६ पदे विभाग अधिकारी (SO) आणि ३६८ पदे सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदे आहेत. फेज १ आणि फेज २ साठी CSIR भरती परीक्षेच्या तारखा लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केल्या जातील. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. (CSIR SO and ASO Recruitment 2023)

पात्रता :

अर्जदारांना अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. भरतीबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

वय :

CSIR भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावी. भरती नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

अर्जाचे नोंदणी शुल्क :

CSIR ASO आणि SO पदांसाठी अर्ज करणार्‍या OPen/OBC/EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. तर SC/ST/माजी सैनिक आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारेच भरावे लागेल.

पगार किती?

निवड झालेल्या उमेदवारांना विभाग अधिकारी (SO) पदासाठी ४७,६०० ते १,५१,१०० रूपये पर्यंत पगार मिळेल. तर सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये पगार मिळेल.

तीन टप्पे करावे लागणार पूर्ण

सेक्शन ऑफिसर (SO) किंवा असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) म्हणून निवड होण्यासाठी, उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या तीन टप्प्यांमधून जावे लागेल. परीक्षेत तीन पेपर असणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक आणि जाहिरात CSIR च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (CSIR SO and ASO Recruitment 2023)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT