CRIS ASE Recruitment 2023 : रेल्वे माहिती प्रणाली केंद्रात मोठी भरती; 'हे' उमेदवार करू शकणार अर्ज; सविस्तर माहिती जाणून घ्या | पुढारी

CRIS ASE Recruitment 2023 : रेल्वे माहिती प्रणाली केंद्रात मोठी भरती; 'हे' उमेदवार करू शकणार अर्ज; सविस्तर माहिती जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे माहिती प्रणाली केंद्र अंतर्गत (CRIS) असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर (ASE) पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. CRIS ASE 2023 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊया.

असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर (ASE) पदाच्या एकुण १८ जागांसाठी ऑनलाइन अर्ज २१ नोव्हेंबर पासून सुरू झाले असून अर्ज करण्यासाठी २० डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी इच्छुक आणि पात्र उमेदवार cris.org.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. (CRIS ASE Recruitment 2023)

महत्त्वाच्या तारखा (CRIS ASE Recruitment 2023)

ऑनलाइन अर्ज सुरू तारीख : २१ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० डिसेंबर २०२३

शैक्षणिक पात्रता

१) ६० टक्के गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/IT) किंवा MCA/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स) किंवा M.E / M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) [SC/ST/PWD: ५५ टक्के गुण] २) GATE २०२३
याशिवाय शैक्षणिक पात्रता सविस्तरमध्ये अधिसूचनेत देण्यात आली आहे. सविस्तर माहित पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देवू शकता.

वयाची अट : २० डिसेंबर २०२३ रोजी २२ ते २७ वर्षे (SC/ST : ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परिक्षा शुल्क : General/OBC : १ हजार (SC/ST/PWD आणि महिलांसाठी फी नाही)

Back to top button