Latest

crime news : अल्पवयीन मुलीवर मावस भावाने केला अत्याचार

अनुराधा कोरवी

कागल (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर क्राईम : मावशीच्या घरी राहण्यासाठी आलेल्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मावसभावाने अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी मुलीस त्रास होवू लागल्यानंतर ती तीन महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा गुन्हा कागल पोलिसात दाखल करण्यात आला आहे. (crime news)

या प्रकरणी २१ वर्षीय मावसभावाला पोलिसांनी अटक केली आहे.

अल्पवयीन मुलगी ही आपल्या मावशीकडे राहण्यास आली होती.

संशयिताने दिनांक ३० जून २०२१ ते २ जुलै २०२१ दरम्यान तिच्यावर अत्याचार केला. यानंतर संशयिताने तिला याबद्दल कोणाला काही सांगू नकोस अशी धमकी दिली.

यानंतर काही दिवसांनी अल्पवयीन मुलीस त्रास सुरू झाल्यावर आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (crime news)

पोलिसांनी तात्काळ मुलगीकडे अधिक चौकशी केली मात्र, संबंधित मुलीने घाबरून याबाबतची कोणतीही माहिती सांगितलेली नाही. यामुळे कोल्हापूर येथील बाल कल्याण समितीतील कन्या निरीक्षण गृह येथे संबंधित मुलगीला १ सप्टेंबर २०२१ रोजीपर्यंत दाखल करण्यात आले आहे.
 हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT