Latest

Cough Syrup : ‘WHO’कडून भारतातील आणखी एका कफ सिरफच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील आणखी एका कफ सिरफच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. भारतातील एका कफ सिरफला दुषित सांगितले आहे. मंगळवारी (दि.२६) रात्रीच्या सुमारास जागतिक आरोग्य संघटनेने  मार्शल आयलंड आणि माइक्रोनेशियामध्ये एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. (Cough Syrup)
वैद्यकीय अलर्टमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, अद्याप भारतातातील दुषित कफ सिरफने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, या सिरफमध्ये गुइफेनेसिन सिरफ, टीजी सिरफ बरोबर डायथिसीव ग्लाइकॉल आणि एथिलीन ग्लाइकॉलचा अंश आढळले आहेत. याच्या सेवनाने मानवाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. या रसायनांची ओळख ऑस्ट्रोलियाच्या नियामकांनी केली होती. गेल्या सहा एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेला ही माहिती देण्यात आली.
डब्ल्यूएचओच्या वैद्यकीय अलर्टमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार डब्ल्यूएचओचा ईमेल मिळाल्यानंतर हरियाणा आणि पंजाब सरकारने या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची शिफारस केली होती.

पंजाब-हरियाणा कंपनीची नावे समोर आली

WHO ने माहिती दिली आहे की पंजाबची QP फार्माकेम लिमिटेड कंपनी या कफ सिरपचे उत्पादन करते. कंपनीने इतर देशांमध्ये वितरणासाठी हरियाणा येथील ट्रिलियम फार्मा नावाच्या कंपनीशी करार केला आहे. या प्रकरणी या दोन्ही कंपन्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. WHO ने सर्व सदस्य देशांना हे कफ सिरप वापरू नये, असे आवाहन केले आहे. WHO म्हणते की या दोन्ही कंपन्यांनी WHO ला कफ सिरपच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबाबत कोणतीही हमी दिलेली नाही.

तिसऱ्यांदा गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले

जागतिक फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी WHO ने दोनदा अलर्ट जारी केला आहे. भारतातील विविध उत्पादकांनी तयार केलेल्या सिरपपासून गांबिया, इंडोनेशिया आणि उझबेकिस्तानमध्ये किडनी खराब झाल्याने 300 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, भारतीय नियामक संस्थांच्या तपासणीत या औषधांच्या बॅच पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आढळून आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT