Kitchen Tips : कितीही जुनी जळलेली भांडी असू दे, २ मिनिटांत चमकतील! ‘या’ वापरा टिप्स | पुढारी

Kitchen Tips : कितीही जुनी जळलेली भांडी असू दे, २ मिनिटांत चमकतील! 'या' वापरा टिप्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण स्वयंपाक घरात भांडी कितीही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केली तरी ती घाण होतातच. (Kitchen Tips ) स्वयंपाक करताना गॅसवर जर भांडी जळाली तर मग त्याचा काळपटपणा कितीही दूर केला तरी जाता जात नाही. सोबत भांड्यांना चिकटपणा राहतोच. आज अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची भांडी नव्यासारखी चमकतील. (Kitchen Tips)

मीठ

सर्वात आधी जळलेली भांडी गरम पाणी घेऊन त्याध्ये एक चमचा मीठ मिसळून काही वेळासाठी ठेवा.

बेकिंग सोडा

स्वयंपाक घरात आपल्याकडे बेकिंग सोडा असतोच. बेकिंग सोड्याचा वापर खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. पण, तुम्हाला माहितीये का, साफसफाईसाठीही बेकिंग सोडा फायदेशीर आहे. बेकिंग सोड्याच्या मदतीने हट्टी काळे डाग सुटण्यास मदत होईल. बेकिंग सोडा आणि पाणी घेऊन पेस्ट बनला त्यामध्ये भांडी भिजवून ठेवा. भांडी स्वच्छ करण्यासाठी डिश साबण किंवा लिक्विड वॉशने धुवून टाका.

lemon
lemon

लिंबू

बेकिंग सोड्यात लिंबू मिसळून भांडी घासल्याने देखील भांड्यावरचे डाग निघून जातील. १ चमचा सोडा, १ लिंबूचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ती भांड्यावर लावून १० मिनिटे ठेवा. यानंतर स्क्रबने रगडून घासावे. पाण्याने धुवून टाकावे.

टोमॅटो केचप

भांडी स्वच्छ करण्यासाठी टोमॅटो केचप  भांड्यावर लावून भांडी घासायच्या चोथ्याने घासा. तेलकट, चिकट डाग निघण्यास मदत होईल.

Back to top button