Latest

Chitra Wagh : महिला आयोगाने उर्फीवर कारवाई का केली नाही; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नगण्य कपडे घालून अंगप्रदर्शन किती योग्य आहे? महाराष्ट्रात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, ही आपली संस्कृती नाही, त्यामुळे नंगानाच खपवून घेणार नाही असा हल्लाबोल करत चित्रा वाघ यांनी उर्फीवर जोरदार टीका केली. (Chitra Wagh) त्याचवेळी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवरदेखील हल्लाबोल केला. महिला आयोगाने उर्फीवर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Chitra Wagh) चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, प्रत्येकाच्या घरात लेकीबाळी, सर्वांच्या समोर काय आदर्श ठेवणार. उर्फीला विरोध नाही, ती जे बिभित्स अंगप्रदर्शन करते, त्याला विरोध आहे. एक बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते. तोकडे कपडे घालून फिरणे किती योग्य आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

त्या म्हणाल्या- सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या नंगानाचवर कारवाई करायला वेळ नाही. उर्फीचा धर्म बघून विरोध नाही. समाजस्वास्थ्य गरजेचं त्यात राजकारण नको. महिला आयोग उर्फीला जाब का विचारत नाही. उर्फीच्या अशा अंग प्रदर्शनावर कारवाई करता येत नसेल तर काय उपयोग? असा प्रश्न विचारत त्यांनी चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवण्याचा अधिकार नाही, असा आरोप केला.

SCROLL FOR NEXT