Latest

Brezza S-CNG : मारुती कारचे ‘हे’ मॉडेल ९ लाख रुपयात सीएनजी प्रकारात लॉन्च

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मारुती सुझुकी ही वाहन निर्माती कंपनी अनेक वर्षांपासून भारतीय बाजारातली सर्वात मोठी आणि पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीने त्यांच्या लोकप्रिय ब्रेझा कार (Brezza S-CNG) मॉडेल आता सीएनजी प्रकारात लॉन्च केली आहे. कंपनीची ही पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही CNG कार आहे. कंपनीचा असा दावा आहे की, कमी खर्चात ज्यादा मायलेज देणारी ही कार असेल. त्यामुळे ब्रेझा कार चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर असणार आहे.

कंपनीने नवी ब्रेझा S-CNG चे ४ मॉडेल लॉन्च झाले आहेत. कारची ९.१४ लाख रुपये सुरुवातीची किंमत आहे. ब्रेझा S-CNG चे बुकिंग देखील सुरु झाले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ग्राहकांना २५००० हजार रुपये इतकी रक्कम भरून बुकिंग टोकन मिळणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये या कारची डिलीव्हरी सुरु होईल, अशी प्राथमिक माहिती आहे. मारुती सुझुकीकडून ब्रेझा CNG कारचा पहिला लुक दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दाखविण्यात आलेला होता. (Brezza S-CNG)

Brezza S-CNG : इंजिनबाबत माहिती

ब्रेझा S-CNG च्या इंजिनबाबत बोलायचे झाले तर, या कारमध्ये 1.5 लीटर ड्युअल जेट, ड्युअल VVT बाय-फ्युअल इंजिन असणार आहेत. सीएनजी प्रकारातील 1.5 लीटर ड्युअल इंजिन हे 87.7 PS आणि 121.5 Nm इतका टॉर्क निर्माण करेल. तसेच ड्युअल व्हिव्हिटी फ्युअल इंजिन हे 100.6 PS आणि 136.5 Nm का टॉर्क निर्माण करतात. या इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्सने सुसज्ज असेल.

Brezza S-CNG : कोणकोणत्या रंगांमध्ये असेल ब्रेझा कार

सीएनजी प्रकारातील ब्रेझा कार कधी येणार याची अतुरता ग्राहकांना होती. तसेच कोणकोणत्या रंगामध्ये उपलब्ध होणार याकडे देखील ग्राहकांचे लक्ष लागून राहिले होते. कंपनीने ही कार स्प्लेंडिड सिल्वर, सिजलिंग रेड, एक्ज्यूबेरेंट ब्लू, पियर्ल आर्कटिक व्हाइट आणि मॅग्मा ग्रे कलर अशा रंगांमध्‍ये ती उपलब्‍ध असणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT