Latest

Parineeti-Raghav wedding: आली लग्न घडी समीप;परिणीती-राघव घेणार सात फेरे

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नेता राघव चड्डा दोघेजण आज लग्न बंधनात ( Parineeti- Raghav wedding ) अडकणार आहेत. हा विवाह सोहळा राजस्थानच्या उदयपूर येथील 'लीला पॅलेस' मध्ये पार पडत आहे. दोन्ही कुंटूबियांनी या लग्नाची जोरदार तयारी केली असून गेल्या दोन दिवसांपासून उदयपूरमध्ये दिखामात पाहूण्याची हजेरी लावली जात आहे. दरम्यान हा विवाहातील संगीत सेरेमनीच्या कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

संबधित बातम्या

परिणीती आणि राघव आज रविवारी (दि. २४ संप्टेबर) रोजी पंजाबी पद्धतीने विवाह बंधनात अडकणार आहेत. या लग्नाचे विधी दुपारी २. ३० वाजल्यानंतर पार पडणार असून यानंतर परिणीती- राघव दोघेजण सारफेरे घेण्यार असल्याची माहिती समोर आली आहे. विवाहाला बॉलिवूडमधील अनेक स्टार्ससोबत राजकिय नेत्यांनी हजेरी लावली आहे. परंतु, परिणीतीची बहिण आणि बॉलिवूड- हॉलिवूड स्टार्स प्रियांना चोप्रा बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहते की नाही? याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. तर अक्षय कुमारही विदेशात असल्याने तोही या लग्नाला हजर राहू शकत नाही.

दरम्यान विरल भयानी इन्टाग्रामवर दोघांच्या लग्नाआधीच्या डेट नाईट पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान लग्नाला पोहोचले आहेत. लग्नाला कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

( video, photo : viralbhayani insragram वरून साभार)

SCROLL FOR NEXT