Parineeti-Raghav Wedding : परिणीती -राघव यांच्या लग्नाचा विधी सुरू; पार पडले सूफी नाईट

Parineeti-Raghav Wedding
Parineeti-Raghav Wedding
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नेता राघव चड्ढा यांचा विवाह ( Parineeti-Raghav Wedding ) येत्या २४ सप्टेंबरला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या विवाहाची जोरदार तयारी सुरू असून उदयपूर येथील भव्य 'लला पॅलेस' सजावट केली गेली आहे. या विवाहाला दोन दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे विवाहाच्या आधी प्री-वेडिंग (विधी) कार्यक्रमाला पार पडत आहेत. दरम्यान परिनिती – राघव यांचा सूफी नाईट हा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

संबधित बातम्या 

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या विवाहाच्या ( Parineeti-Raghav Wedding ) आधी २० सप्टेंबर रोजी सूफी नाईटचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे आयोजन दिल्लीतील राघव याच्या घरी केलं आहे. या कार्यक्रमाला परिणीतीची मावशी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा, भाऊ सिद्धार्थ चोप्रा, डिझायनर पवन सचदेवा आणि राज्यसभा ससद सदस्य हरभजन सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमासाठी राघवचे घर अतिशय सुंदर सजवण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही कपलने गुरूद्वारामध्ये जावून गुरूचे आशीर्वाद घेतले. परिणीती – राधव दोघेजण यावेळी ग्लॅमरस दिसत होते. दरम्यान मधु चोप्रा आणि सिद्धार्थने सर्वाचे लक्ष वेधून घेतलं.

परिणीती आणि राघव चढ्ढा यावर्षी १३ मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पाडला होता. यानंतर हे कपल उदयपूरच्या हॉटेल लीला पॅलेसमध्ये सात फेऱ्या मारण्यास सज्ज झाले आहेत. २४ सप्टेंबर रोजी पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. राघव-परिणितीच्या लग्नाचे रिसेप्शन ३० सप्टेंबरला होणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news