Ambani Ganesh Chaturthi : २५ वर्षांच्या नव्या नंदासमोर ऐश्वर्या रायदेखील पडली मागे | पुढारी

Ambani Ganesh Chaturthi : २५ वर्षांच्या नव्या नंदासमोर ऐश्वर्या रायदेखील पडली मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच त्याच्या घरी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. ( Ambani Ganesh Chaturthi ) या कार्यक्रमानिमित्ताने अंबानी यांनी एका भव्य पार्टीचे आयोजन करत बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींनी आमंत्रित केले होतं. या पार्टीला सलमान खानपासून ते ऐश्वर्या रायपर्यत अनेक स्टार्सनी हजेरी लावली. मात्र, दरम्यान ऐश्वर्या रॉयची नणंद श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नवेली नंदाच्या लूकनं सर्वाचे लक्ष वेधून घेतलं. यामुळे भाची समोर मिस वर्ल्ड असूनही ऐश्वर्याच्या साध्या लूकनं ती मागे पडल्याची चर्चा रंगू लागली आहे.

संबधित बातम्या 

उधोगपती मुकेश अंबानी यांनी ( अँटिलिया) ठेवलेल्या गणेश उत्सवाच्या ( Ambani Ganesh Chaturthi ) संध्याकाळच्या पार्टीला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, वरुण धवन, दीपिका पादुकोण, नयनतारा, करिश्मा कपूर यांच्यासह अनेक दिग्गज स्टार्संनी हजेरी लावली. दरम्यान मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत सलवार कमीजमध्ये दिसली. दोघींनी एकसारखेच कपडे घातले असून सिंपल लूक कॅरी केला होता. तर दोघांच्या कपड्याचा रंग मात्र, वेगवेगळा होता.

तर दुसरीकडे ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नंदा भरजरी डिझाईन असलेल्या गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. यापार्टीत नव्या पोहोचताच सर्वाचे नजरा तिच्यावर खिळल्या. नव्यासोबत या पार्टीत तिचा भाऊ अगस्त्या नंदा व्हाईट रंगाच्या कुर्ता आणि पायजमामध्ये हॅडसम दिसला. ऐश्वर्या आणि भाची नव्याचा हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी दोघींच्या लूकचे कौतुक करताना भरभरून कॉमेन्टस केल्या. आहेत. दरम्यान एका युजर्सने ‘२५ वर्षांच्या भाची नव्या नवेलीच्या समोर मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय मागं पडली’ असल्याचे म्हटलं आहे. या व्हिडिओला आतापर्यत १६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button