Parineeti -Raghav | परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी घेतले महाकालचे दर्शन (व्हिडिओ) | पुढारी

Parineeti -Raghav | परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी घेतले महाकालचे दर्शन (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा या दोघांनी आज (दि.२६) उज्जैनमधील महाकालचे दर्शन घेतले. यावेळी या दोघांनी जोडीने मंदिरात पूजा केली. येथील महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आज १२ वाजता उज्जैनला पोहोचले. येथील हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांती घेतली. दुपारी एक वाजता महाकालेश्वर मंदिरात पोहोचत त्यांनी महाकालचे दर्शन घेतले. मंदिराच्या नियमानुसार राघवने धोतर-सोला परिधान केला होता, परिणीतीने साडी नेसली होती. या दोघांच्या जोडीने ३० मिनिटे शांतीपाठ पूजा केली. मीडियाशी बोलताना त्यांनी ‘जय महाकाल’चा जयघोष करत कोणतेही भाष्य करणे टाळले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्यसभा सदस्य राघव चड्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे दोघे पुढच्या महिन्यात २५ सप्टेंबरला लग्न करणार आहेत. या वर्षी १३ मे रोजी दोघांनी दिल्लीत एंगेजमेंट केली होती. एंगेजमेंट सोहळा फक्त त्यांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला.

हेही वाचा :

Back to top button