Latest

Bobby Deol : ‘आश्रम’चे बाबा निराला आता ‘श्लोक- द देसी शेरलॉक’मध्ये धुमाकूळ घालणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता बॉबी देओलसाठी २०२२ हे वर्ष खूप खास आहे आणि आश्रम सीझन २ मधील त्याच्या दमदार भूमिकेबद्दल आपण सर्वजण जाणतो. अभिनेता बॉबी देओलसाठी (Boby Deol) २०२२ हे वर्ष खूप खास ठरले आहे आणि आश्रम सीझन-२ मधील त्याचा अभिनय सर्वांनीच पाहिला आहे. यामध्ये बाबा निराला यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. बॉबी आता कुणाल कोहलीचा पुढील चित्रपट 'श्लोक – द देसी शेरलॉक'मध्ये दिसणार आहे. "देसी शेरलॉक"ची घोषणा त्याने सप्टेंबरमध्ये त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा केली होती. अनन्या बिर्ला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. (Bobby Deol)

बॉबी देओलने त्याच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे शूटिंग संपल्याची घोषणा केली. त्याने म्हटले होते- "And it's a wrap for #Shlok ? Had a wonderful time working with the A-team, some of the most amazing people I've worked with ?"

श्लोका हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, बॉबी मोठ्या पडद्यावर आपल्या नवीन अवताराने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज आहे. श्लोका व्यतिरिक्त, बॉबी पुढे रणबीर कपूरच्या 'अॅनिमल', 'आश्रम सीझन ३' आणि 'पेंटहाऊस'मध्ये दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT