British royal family : विल्यमच्या सहकार्‍यांनी पेरलेल्या बातम्यांमुळे पत्नीचा गर्भपात : प्रिन्स हॅरी | पुढारी

British royal family : विल्यमच्या सहकार्‍यांनी पेरलेल्या बातम्यांमुळे पत्नीचा गर्भपात : प्रिन्स हॅरी

लंडन : ब्रिटिश राजघराणे (British royal family) हे नेहमीच चर्चेत असते. पूर्वी लेडी डायना आणि प्रिन्स चार्ल्समुळे मीडियात सतत बातम्या येत असत. हल्ली प्रिन्स हॅरी व त्याची अमेरिकन अभिनेत्री पत्नी मेघन मार्केल हीच्यामुळे ब्रिटिश मीडियाला रोज नवे खाद्य मिळत आहे. हॅरी यांनी गुरुवारी जरी आपल्या नव्या माहितीपटात ब्रिटिश राजघराण्यावर नवे गंभीर आरोप केले आहेत. ‘प्रिन्स विल्यमच्या सहकार्‍यांनी माध्यमात माझ्या व माझ्या पत्नीविषयी नकारात्मक बातम्या पेरल्या. या बातम्यांमुळे मेघनचा गर्भपात झाला’,‘ असे त्याने म्हटले आहे.

हॅरी म्हणाला की, ‘मी माझ्या भविष्याविषयी जेव्हा कुटुंबीयांपुढे (British royal family) चर्चा करत होतो, तेव्हा माझा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम माझ्यावर अत्यंत वाईट पद्धतीने ओरडला. त्यावर माझे वडील अशा गोष्टी करू लागले, ज्या अवास्तव होत्या. माझी आजीही हे सर्वकाही शांतपणे पाहत होती’. राजघराण्याच्या कम्युनिकेशन टीमला एखादी बातमी माध्यमांत छापण्यापासून रोखायची असेल, तर त्याऐवजी ते राजघराण्याची दुसरी एखादी खमंग बातमी माध्यमांना देतात. हा एक अत्यंत वाईट खेळ आहे. मी व विल्यमने पाहिले होते की, आमचे वडील किंग चार्ल्सच्या कार्यालयासोबत काय झाले होते.

माझी आई राजकुमारी डायना व किंग चार्ल्स यांचा विवाह माध्यमांमुळेच मोडला होता. त्यामुळे आम्ही त्याची केव्हाही पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेत होतो. यावर आम्हा दोघांचेही मतैक्य होते. या खेळात सहभागी होण्याऐवजी माझा तो खेळ संपवण्यावर भर असेल. हे अत्यंत हृदयद्रावक होते.’ दुसरीकडे, बकिंगहॅम पॅलेस व विल्यमचे कार्यालय केंसिंग्टन पॅलेसने हॅरीच्या डॉक्युमेंट्रीवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

हॅरीने म्हटले आहे की, ‘प्रिन्स विल्यम त्यांच्यावर ओरडत होते. मी जे प्रस्ताव सार्वजनिक केले होते, तेच घेऊन मी सँड्रिंघमला गेलो होतो, पण तिथे पोहोचल्यानंतर माझ्यापुढे 5 पर्याय ठेवण्यात आले. मी त्यातील 3 पर्यायांची निवड केली. माझ्याकडे स्वतःचा रोजगार आहे. पण मी महाराणींनाही सहकार्य करेल असे मी म्हणालो, पण काही वेळातच तिथे बोलण्याला काहीच अर्थ नसल्याचे माझ्या लक्षात आले.

हेही वाचा : 

Back to top button