Latest

Bharat Or India : ‘X’ वर ‘भारत’चा ट्रेंड; लाखो लोकांनी वापरला कीवर्ड

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क:  सध्या इंडिया आणि भारत हे दोन्ही नाव खूप चर्चेत आहेत. भारतीय राज्यघटनेतून 'इंडिया' हे नाव काढले जाणार आहे आणि त्याऐवजी भारत हे नाव करण्यात येणार आहे, अशी मोठी चर्चा मंगळवारी सर्वच माध्यमांमध्ये रंगली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मंगळवारी (दि.५) 'भारत' हा सर्वाधिक शोधला जाणारा कीवर्ड होता. त्या दिवशी भारत हा जगात सर्वाधिक वापरला जाणारा कीवर्ड होता. ट्विटरवर ४ लाख ७४ हजार युजर्सनी भारत हा कीवर्ड वापरला आहे. जाणून घ्या भारत का चर्चेत आहे.  (Bharat Or India)

Bharat Or India : 'भारत' हा कीवर्ड अचानक ट्रेंडिंग का सुरू झाला?

G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभती भवनातून आलेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर "प्रेसिडेंट ऑफ इंडिया" ऐवजी "प्रेसिडेंट ऑफ भारत" असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून देशातील राजकारण तापले आहे. नामांतराच्‍या मुद्यावर  विरोधी आघाडीतील अनेक पक्ष आक्रमक झाले असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून व्‍यक्‍त हाेत आहेत. (India-Bharat) सध्या ट्विटरवर 'भारत'चा ट्रेंड सुरु आहे.

सर्वाधिक वापरला जाणारा कीवर्ड 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एस्कवर मंगळवारी (दि.५) 'भारत' हा सर्वाधिक सर्च केलेला कीवर्ड होता. 'भारत' हा कीवर्ड आज जगभरात सर्वाधिक वापरला गेला. जो एक रेकॉर्ड बनला आहे, असे अमर उजालाने म्हटले आहे. 'X' वर, जगभरातील वापरकर्त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये 'भारत' हा कीवर्ड ४ लाख ७४ हजार वेळा वापरला आहे.

हे आहेत सर्वाधिक वापरलेले कीवर्ड आहेत

  • भारत: 474k
  • Beyonce: 350k
  • कलम 1: 284k
  • शिक्षक दिन: 165k

Bharat Or India :  …आम्ही खचून जाणार नाही : जयराम रमेश

पंतप्रधान मोदी हे सतत इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. जो भारत अनेक राज्यांचा संघ आहे. त्याला विभाजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; पण आम्ही खचून जाणार नाही. शेवटी इंडिया आघाडीतील पक्षांचे उद्दीष्ट हे 'भारतात सौहार्द, सलोखा आणि विश्वास आणणे हाच आमचा प्रयत्न असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT