Latest

बेळगाव : १३ जलवाद मिटवले, कर्नाटक- महाराष्ट्र वाद मिटवण्यात अपयश, नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

backup backup
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा

मी केंद्रीय जलसंपदा मंत्री असताना देशातील 20 पैकी 13 आंतरराज्य पाण्याचे तंटे निकालात काढले. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद मिटवण्यात मला अपयश आले, अशी खंत केंद्रीय राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, देशात 1970 पासून जे अंतरराज्य तंटे आहेत ते मिटवण्याचा मी निर्णय घेतला. एकूण 20 पाण्याचे तंटे होते. यापैकी हरियाण, पंजाब, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील 13 अंतरराज्य तंटे मी मिटवले. तंटे मिटवताना मी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ बोलावत होतो.

बैठक सुरू झाल्यानंतर मी सभागृहाचा दरवाजा बंद करीत होतो. हा दरवाजा तंटा मिटवल्यानंतरच उघडला जाईल, असा इशारा शिष्टमंडळाला देत होतो. अशा पद्धतीने मी 13 तंटे मिटवले. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक जलवाद मिटवण्यात अपयश आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT