पुढारी ऑनलाईन डेस्क : आता जेव्हा विराट कोहलीसाठी (Virat Kohli) धावांचा शोध जणू दिवसेंदिवस लांबतच चालला आहे. या त्याच्या ऑऊट फॉर्मने टीम मॅनेजमेंटसह बीसीसीआय आणि आता चाहत्यांचे देखील टेंशन वाढवत चालले आहे. त्याच्यासाठी जणू धावांचा निर्माण झालेला दुष्काळ संपताच संपेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. आता खुद्द बीसीसीआयच्या अध्यक्षांकडूनच सल्ला मिळाल्याने पुन्हा एकदा त्याचा खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Virat Kohli And Sourav Ganguly)
विराट कोहली याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये विश्रांती देण्यात आली आहे. पण, त्यांच्या बाबतीत ही विश्रांती आहे की, सक्तीची विश्राती हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही काळापासून विराट कोहलीची बॅटने जणू मोठ्या काळासाठी विश्रांती घेतली आहे. २०१९ पासून विराट कोहली याने कोणत्याही क्रिकेटच्या प्रकारात शतक झळकावलेले नाही. यावरुन त्याच्या ऑऊट ऑफ फॉर्मचा अंदाज येऊ शकतो. आता वेस्ट इंडिज दौऱ्यावरुन तर्क वितर्क मांडले जावू लागले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार विराट कोहली यानेच या दौऱ्यावरुन विश्रांतीची मागणी केली होते. तसेच या नंतरच्या सर्व सामन्यासाठी आपण उपलब्ध राहू असे सांगितले होते. याचा अर्थ पुढील एक महिना तो विश्रांती घेणार आहे. (Virat Kohli And Sourav Ganguly)
या त्याच्या विश्रांती वरुन अनेक दिग्गज माजी खेळाडू विराट कोहलीची टिका करत आहेत. तर काही खेळाडू त्याचे समर्थन देखिल करत आहेत. काहींनी विराट कोहलीला विश्रांती घेऊन फॉर्म परत येत नसतो असा टोला लगावला आहे. तर काहींनी फॉर्म नसताना कोहलीला भारतीय संघात वारंवार संधी का दिली जाते यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच आर. अश्विनला संघातून बाहेर ठेवले जाते तर विराटला का बाहेर ठेवले जात नाही असा एक सूर आवळला जात आहे. (Virat Kohli And Sourav Ganguly)
या सर्वांमध्ये आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने उडी घेतली आहेत. त्याने याबाबत बोलत विराट कोहलीला एक संदेशच दिला आहे. विराटच्या फॉर्म विषयी गांगुली म्हणाला की, सध्या विराट हा अत्यंत वाईट काळातून जात आहे. त्याला माहिती आहे की, या समस्येतून स्वत:लाच मार्ग काढायचा आहे. मला विश्वास आहे विराट पुन्हा जोरदार पुनरागमन करेल. तसेच जेव्हा धावा बनविण्याचा प्रश्न येतो तेथे त्यालाच त्याचा मार्ग शोधावा लागणार आहे. यामध्ये त्याला नक्कीच यश मिळेल. तसेच तो येथून पुढे १२ -१३ वर्षे क्रिकेट खेळू शकेल. (Virat Kohli And Sourav Ganguly)
गांगुली पुढे म्हणाला, खेळामध्ये चढ उतार चालूच राहतात. सचिन तेंडूलकर सुद्धा अशा अवस्थेतून गेला आहे. राहुल द्रविड आणि माझ्यासोबत सुद्धा हे घडले आहे. तसेच पुढे येणाऱ्या खेळाडुंसोबत सुद्धा असे घडणार आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे की, तुम्हाला खेळाडू म्हणून लोकांचे ऐकले पाहिजे, सजग राहिले पाहिजे आणि तुमचा स्वाभाविक खेळ खेळत राहिला पाहिजे.