Latest

Baba Ramdev Tweet : ‘आय एम सॉरी…’ शिक्षण व्यवस्थेवर रामदेव बाबा यांचे प्रश्नचिन्ह; जाणून घ्या प्रकरण

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वत्र परीक्षांचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्येही १६ मार्चपासून दहावी बोर्डच्या परीक्षा सुरु होणार आहेत. या दहावी परीक्षेचा तणाव घेत एका विद्यार्थीनीने आपलं जीवन संपवलं आहे. तिने जीवन संपवण्यापूर्वी आपल्या आई-बाबांची माफी मागत एक नोट लिहित आपली मानसिक अवस्था सांगितली आहे. या संदर्भाने योग गुरु रामदेव बाबा यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, हे एका निष्पापापाने आपलं जीवन संपवण्यापूर्वी आपल्या आई बाबांना लिहिलेली ही नोट नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह आहे. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण. (Baba Ramdev Tweet)

Baba Ramdev Tweet : पप्पा-मम्मी.. मला माफ करा

राजस्थानमध्ये १६ मार्चपासून दहावी बोर्डच्या परीक्षा सुरु होत आहेत. राज्यातील दौसा जिल्ह्यातील लालसोट शहरातील न्यू कॉलनीमध्ये गुरुवारी (दि.२) एक घटना घडली. दहावीच्या विद्यार्थीनीने परीक्षेच्या तणावात आपलं जीवन संपवलं. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. तत्पूर्वी तिने आपल्या आई-बाबांना उद्देशून एक नोट लिहिली आहे. ही नोट तिने हिंदीमध्ये लिहिली आहे. त्या नोटचा आशय असा की,"पप्पा-मम्मी.. मला माफ करा. मला नाही जमणार. मी कदाचित ९५% मार्क्स पाडू शकणार नाही. मी या दहावीच्या वर्गावर नाराज आहे. मला आता सहन होत नाही. पप्पा, मम्मी आणि ऋषभ माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा- खुशबू"

खुशबुचे वडील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, खुशबुवर आम्ही कोणत्याही स्वरुपाचा मार्क्सबाबत दबाव आणला नव्हता. व ती या काही दिवसात तणावातही जाणवत नव्हती. ती असं टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. तर खुशबूच्या शाळेचे मुख्याध्यापक विश्राम गुर्जर म्हणाले की, खुशबू ही विद्यार्थिनी अभ्यासात कमकुवत होती असे नाही. ती हुशार होती. पण तिचे मार्क ९५ टक्क्यांच्य वर पडतील की नाही याची तिला खात्री नव्हती.

शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या पार्श्वभूमीवर योगगुरु रामदेव बाबा यांनी ट्विट करत संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी खुशबूच्या नोटमधील लेखन ट्विट करत म्हंटलं आहे की, ही फक्त खुशबुची नोट नाही आहे तर हे आपल्या संपूर्ण शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT